ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

आपल्या ई-अभिव्यक्तीचे प्रमुख संपादक मा. श्री. हेमंत बावनकर यांनी आपल्या सर्वांसाठी पाठवलेला संदेश —-

सर्व सुह्रदांना नमस्कार,

ईश्वराची कृपा आणि आपल्या सर्वांचा मनापासूनचा स्नेह यामुळे मी करोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर

येऊ शकलो माझ्या आणि आपणा सर्वांच्याच दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या ई-अभिव्यक्तीचे

कामही पुन्हा नव्या जोमाने करायला लागलो होतो. इतक्यात प्रकृतीच्या काही कठीण समस्यांनी मला पुन्हा

घेरले. म्हणतात ना-

                                                           “होइहि सोइ जो राम रचि राखा”

— हेच खरं. पण परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे, आणि लवकरच मी पूर्ण बरा होऊन ई- अभिव्यक्तीला

नव्या तांत्रिक स्वरूपात आपल्यासमोर प्रस्तुत करू शकेन. त्याचबरोबर आपणा सर्वांचे लिखाण वेबसाईटवर

सन्मानाने प्रकाशित करू शकेन .

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि स्नेहाची अपेक्षा करत आहे. ????

हेमंत बावनकर

ई-अभिव्यक्ती मराठी विभागाचे सर्व संपादक आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना करतो की श्री. बावनकर

सरांना लवकरात लवकर पूर्णपणे प्रकृतीस्वास्थ्य लाभो. ????

श्रीमती उज्ज्वला केळकर, सम्पादिका ई-अभिव्यक्ती (मराठी)

सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈