श्री सुहास रघुनाथ पंडित
११ जानेवारी – संपादकीय
यशवंत दिनकर फडके :
य दि या नावाने परिचित असलेले श्री. फडके यांचा जन्म सोलापरचा.त्यांचे शालेय शिक्षण सोलापूरात झाले.नंतर त्यांनी उच्च शिक्षण पुण्यात घेतले.बी.ए.व नंतर एम.ए या पदव्या संपादन केल्यानंतर ते मुंबई विद्यापीठाचे पीएच.डी. वारकरी झाले.
त्यांनी प्रामुख्याने चरित्रलेखन व इतिहास संशोधन केले आहे.आगरकर, र.धों. कर्वे,
विष्णूशास्त्री चिपळूणकर,शाहू छत्रपती आणि लोकमान्य,सेनापती बापट,कहाणी सुभाषचंद्रांची,
शोध सावरकरांचा, इ.चरित्र पुस्तके त्यांनी लिहीली आहेत.याशिवाय लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक,राष्ट्रपती डाॅ.राजेंद्रप्रसाद ते प्रतिभाताई पाटील या पुस्तकांचाही उल्लेख करावा लागेल.
ऐतिहासिक पुस्तकांमध्ये डाॅ.आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह,स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान,विसाव्या शतकातील महाराष्ट्र खंड 1 ते 8 इ.पुस्तकांचा समावेश होतो.याशिवाय त्यांनी ललित,वैचारिक,माहितीपर लेखनही केले आहे.आजकालचे राजकारणी,नथुरामायण,मुंबईचे खरे मालक कोण,संसद:तेव्हा आणि आत्ता,व्यक्ती आणि विचार अशा अनेक पुस्तकांतून त्यांचे विविध प्रकारचे लेखन दिसून येते.
वाद प्रतिवाद हे वासंती फडके यांनी संपादित केलेले पुस्तक आहे.यामध्ये यदिं नी घातलेल्याा विविध वैचारिक वादांचे संकलन आहे.विविध क्षेत्रातील भिन्न भिन्न विचारसरणीच्या विविध व्यक्तींच्या विचारांचे दर्शन येथे होते.विचारांचा लढा विचारांनीच दिला पाहिजे या मताशी ठाम राहून खेळलेले हे वाद मराठी साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत.
अकरा जानेवारी हा य.दि.फडके यांचा स्मृतिदिन.(2008). त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈