ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १४ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गंगाधर नारायण जोगळेकर:

गं.ना.जोगळेकर या नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ लेखक हे भाषाशास्त्रज्ञ व समीक्षकही होते.त्यांचा जन्म जमखंडी येथे झाला.मॅट्रीक पर्यंत तिथे शिक्षण पूर्ण करून पुढचे पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी सातारा व सांगली येथे पूर्ण केले.त्यानंतर पुणे विद्यापीठात एम्.ए.केले.पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात ते मराठी विभाग प्रमुख होते व त्या महाविद्यालयाचे प्राचार्यही होते.काही काळ त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महविद्यालयात मराठी अध्यापनाचे काम केले.महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे या संस्थेशी सुमारे तीस वर्षे ते निगडीत होते.या संस्थेचे ते सहा वर्षे कार्याध्यक्ष होते.

सुरुवातीला त्यांनी विडंबनात्मक काव्य लेखन केले.परंतु पुढे त्यांचे लेखन हे भाषाशास्त्र व समीक्षा याविषयीच होते.

त्यांची ग्रंथसंपदा:

महाराष्ट्र आणि मराठी भाषा

अभिनव भाषाविज्ञान.

मुद्रा उपचार पद्धती.

मराठी वाड्मयाचा अभिनव इतिहास.

मराठी टीकाकार व साहित्य समीक्षा स्वरूप व विकास या पुस्तकांसाठी त्यांनी सहलेखन केले.त्यांचे ‘मराठी भाषेचे ठळक विशेष’ हे पुस्तक मुक्त विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्यात आले.

श्री.जोगळेकर यांचे 2007 मध्ये निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.

श्री.जोगळेकर यांना विनम्र अभिवादन .🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया, सहपिडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈