श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
माधव मनोहर वैद्य
समीक्षेतील फौजदार असा ज्यांचा दबदबा होता त्या माधव मनोहर यांनी कथा, कादंबरी, नाट्य अशा अन्य साहित्य प्रकारातही लेखन केले होते. इंग्रजी साहित्याचे वाचन केल्यावर त्या साहित्याने ते प्रभावित झाले व मराठी साहित्याची समीक्षा करावी असे वाटल्यामुळे ते समीक्षेकडे वळले. केसरी, सोबत, नवशक्ती, रत्नाकर, रसरंग अशा विविध दैनिके व नियतकालिकांमधून त्यांनी ललित व समीक्षात्मक लेखन केले. कोणत्याही लेखकाच्या साहित्यातील गुणदोषांकडे ते समान वृत्तीने पहात असत. त्यामुळे त्यांच्या समीक्षेला महत्व प्राप्त झाले होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या साहित्याची समीक्षा करावी असे साहित्यिकांना वाटत असे.
त्यांची काही भाषांतरीत व रूपांतरीत नाटके :
आई,आजोबांच्या मुली,आपण सा-या दुर्गाबाई,चेटूक,प्रकाश देणारी माणसं,रामराज्य इ.
अन्य साहित्य :
कथा व कादंबरी: आशा,मुलांची शाळा,अन्नदाता,एक आणि दोन,किल्ली इ.
निवडक साहित्य: पंचमवेध
सन्मान:
विष्णूदास भावे सुवर्णपदक-1981, अ.भा.नाट्यसंमेलन अध्यक्ष, सातारा-1990
16मे 1994ला त्यांचे निधन झाले.
त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
माधव गोविंद काटकर
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे जन्मलेले काटकर यांनी बी.ए.बी.टी.शिक्षण पूर्ण केले व शिक्षकी पेशा स्विकारला.त्यांनी कथा,कविता,बालसाहित्य विपुल प्रमाणात लिहीले आहे.
कादंबरी: पडक्या गढीचे गूढ
चरित्र: झुंजार लोकमान्य
कविता: जयजयवंती, मधुधारा, मनमाधवी
बालकविता: मुलांची गाणी, आटपाट नगरात, गंमतगाणी, पिंपळ पाने, गाजराची पुंगी, चांदण्याचे घर, जमाडी गंमत इ.
बालकथासंग्रह: बोलक्या कथा, मंगल कथा, सुनीती कथा इ.
16 मे 2000 रोजी त्यांचे निधन झाले.
त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, आधुनिक मराठी काव्यसंपदा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈