श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १८ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
नारायण धारप:
नारायण धारप हे मराठीतील ख्यातनाम कथालेखक होते. त्यांच्या कथा या प्रामुख्याने भयकथा,गूढकथा व विज्ञानकथा असत.’समर्थ’ हे त्यांचे काल्पनिक पात्र अत्यंत लोकप्रिय झाले होते.त्यांनी नाट्य लेखनही केले होते.
धारप यांचे काही साहित्य:
विज्ञानकथा: अशी रत्ने मिळवीन, अशी ही एक सावित्री, कांताचा मनोरा, चक्रधर, दुहेरी धार, नेणचिम, पारंब्यांचे जग, मृत्यूच्या सीमेवर इत्यादी
भगत कथा: काळी जोगीण, सैतान
समर्थ कथा: मृत्यूजाल, मृत्यूद्वार, विषारी वर्ष, शक्तीदेवी, समर्थ, समर्थांचा प्रहार, समर्थांचे पुनरागमन, समर्थांची शक्ती, समर्थाचिया सेवका इत्यादी
नाटक: चोवीस तास.
श्री.नारायण धारप यांचे 18/8/2008 रोजी निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन आहे.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
प्रभाकर लक्ष्मण मयेकर
प्र.ल.मयेकर हे प्रामुख्याने नाटककार म्हणून ओळखले जातात.मुंबईत बेस्ट मध्ये नोकरीत असल्यापासून व नंतर रत्नागिरीत स्थायिक झाल्यावरही त्यांनी नाट्यलेखन केले.सुरूवातीला सत्यकथेत आलेल्या मसीहा या कथेचे त्यांनी नाट्यरूपांतर केले.नंतर हौशी रंगभूमी व व्यावसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाट्यलेखन केले.मोहन वाघ यांच्या चंद्रलेखा व मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली या संस्थांकडून त्यांची नाटके सादर झाली.मालवणी भाषेतील त्यांची नाटके भद्रकाली ने सादर केली. कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यमय, थरारक अशा सर्व प्रकाचे नाट्यलेखन त्यांनी केले आहे.तसेच एकांकिका, पटकथालेखन, मालिका लेखन व कथा लेखन ही केले आहे. त्यापैकी काही याप्रमाणे:
नाटके: अथ मानूस जगनं हं, आद्यंत इतिहास, अग्निपंख, रातराणी, रानभूल, रमले मी, दिशांतर, सवाल अंधाराचा, तक्षकयाग, डॅडी आय लव्ह यू, आसू आणि हासू ,दीपस्तंभ इत्यादी
एकांकिका: रक्तप्रपात, अनिकेत, होस्ट, अब्दशब्द, अतिथी, एक अधुरी गझल, भास हा माझा इ.
चित्रपटकथा : विधिलिखित, रंग प्रेमाचा, पुत्रवती, वहिनीची माया, जोडीदार, रेशीमगाठ
दूरदर्शन मालिका लेखन: रथचंदेरी, दुरावा, दुहेरी
कथासंग्रह: मसीहा, काचघर
पुरस्कार:
राज्य नाट्य स्पर्धेत अनेक पुरस्कार प्राप्त.
मामा वरेरकर पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, रा.ग.गडकरी पुरस्कार, गो.ब.देवल पुरस्कार, वसंतसिंधु पुरस्कार
याशिवाय पटकथा लेखन पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
18ऑगस्ट 2015 ला त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈