श्रीमती उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १९ जुलै -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
धोंडो विठ्ठल देशपांडे
धोंडो विठ्ठल देशपांडे हे एक नामवंत शिक्षक, फर्डे वक्ते आणि थोर समीक्षक होते. मराठी आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. जगातील अभिजात साहित्याचा आणि संहिताशास्त्राचा त्यांचा गाढ व्यासंग होता. मर्ढेकरांच्या कविता आणि जी. ए. कुलकर्णीच्या कथा यांचे विवेचन त्यांनी आपल्या ग्रंथातून केले. अश्मसार या नावाने मराठी समीक्षेत त्यांनी केलेल्या लेखणामुळे मोलाची भर पडली आहे. धो. वि, देशपांडे हे शिक्षक मतदार संघातून दोन वेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते.
बुद्धिमता, तर्कसंगत युक्तिवाद आणि डौलदार वक्तृत्व यामुळे त्यांची भाषणे प्रभावी होत. शिक्षकांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले आणि शिक्षणाचा दर्जा उंचवला पाहिजे असा सतत आग्रह धरला, देशपांडे हे कोणत्याही पक्षाच्या चौकटीत बसले नाहीत. साहित्य क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात आणि सार्वजनिक जीवनात ते व्यक्तिवादी होते.
आज त्यांचा स्मृतीदि. त्यानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, साप्ताहिक साधना टीम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈