श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
वसंत नारायण उर्फ राजा मंगळवेढेकर:
राजा मंगळवेढेकर हे प्रामुख्याने मराठीतील बालसाहित्यकार व चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.साने गुरुजींच्या सहवासामुळे ते बालसाहित्याकडे वळले.कथा,चरित्रे,कविता,विज्ञान ,पर्यावरण असे विविध प्रकारचे लेखन विपुल प्रमाणात केले आहे.
मंगळवेढेकर यांची साहित्य संपदा:
आपला भारत (पुस्तक मालिका)
कुमार संस्कार माला(पुस्तक मालिका)
आवडत्या गोष्टी
कथा आणि कथाकथन
करी मनोरंजन मुलांचे
कहाणी एका प्रयोगाची
तळ्याकाठची अप्सरा
तेनालीरामाच्या चातुर्यकथा
देशोदेशींच्या कथा
प्रियतम भारत इ.इ.इ.
इंदिरा गांधी,पंडित नेहरू,साने गुरुजी,बाबासाहेब आंबेडकर,म.गांधी,समर्थ रामदास,डाॅ.राधाकृष्णन्,गौतम बुद्ध इत्यादींची चरित्रे.
बिनभिंतीची उघडी शाळा(ललित)
वेडगाणी(कविता)
बालनाट्ये:
चतुराई,बनवाबनवी
गीते:
असावा सुंदर चाॅकलेटचा बंगला
उर्मिले त्रिवार वंदन तुला
कोणास ठाऊक कसा पण शाळेत
सती तू दिव्यरूप मैथिली
प्राप्त पुरस्कार:
गदिमा पुरस्कार
जवाहरलाल नेहरू स्मृती पुरस्कार
बालसेवा पुरस्कार
बाल आनंद पुरस्कार
बाबुराव शिरोळे बालसाहित्य पुरस्कार
एक एप्रिल 2006 रोजी श्री.मंगळवेढेकर यांचे निधन झाले.त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
विजया जहागिरदार :
मराठीतील प्रसिद्ध लेखिका,कवयित्री व बालसाहित्यकार विजया जहागिरदार या बालकुमार साहित्य मंच या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.आपल्या लेखणीतून त्यानी मनोरंजक भाषेतून विज्ञान समजावून सांगितले.त्यांच्या काही पुस्तकांचे आकाशवाणीवरून वाचन झाले आहे.विसाव्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
कथासंग्रह::
अग्निक्षण,कालचक्र,केसरपक्षी,तिने काय करावे?,वेंधळी इ.
कादंबरी::
अर्धविराम,आत्मसाक्षी,नियंती,
मनगुंफा,रणयोगिनी,उद्रेक इ.
काव्यसंग्रह::
आकाश मोगरा,काव्य कोडी,शाकुंतल स्त्री नक्षत्र इ.
बालसाहित्य::
टिम टिम टिकली, निर्मळ कहाण्या,भिरभिरं इ.
बालकविता::
खडीसाखरेचे वेल,छुम छुम गाणी,जा बै आई,फजितवाडा इ.
पुरस्कार::
मध्य प्रदेश साहित्य अकादमीचा
भा.रा.तांबे पुरस्कार ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकास.
उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार..महाराष्ट्र राज्य ‘लपाछपी’या पुस्तकास
तसेच ‘हिरकण्या’ व ‘भिरभिरं’ या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार.
एक एप्रिल 2020 रोजी त्यांचे सोलापूर येथे निधन झाले.
त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
संजीवनी मराठे :
संजीवनी मराठे यांनी ललित लेखन,काव्य,बालसाहित्य आणि गीत लेखन अशा अनेक प्रांतात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.काव्यलेखन तर त्यांनी शालेय जीवनापासूनच सुरू केले होते.कोल्हापूर येथे भरलेल्या साहित्यसंमेलनात 1932साली त्यांनी कविता सादर करून या क्षेत्रात प्रवेश केला.त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या स्वतः काव्यगायन करून कविता सादर करत असत.त्यांच्या काव्यावर भा.रा.तांबे व रवींद्रनाथ टागोर यांचा प्रभाव दिसून येतो.त्यांच्या बालगीतातून बालकांची निरागसता व्यक्त होते.त्यांच्या भावगीतांनी मराठी रसिकाला एके काळी मंत्रमुग्ध केले होते.त्यांच्या कविता आणि गीतांमुळे त्या आजही रसिकांच्या मनात स्थान मिळवून आहेत.
संजीवनी मराठे यांचे साहित्य:
कवितासंग्रह–
काव्यसंजीवनी,राका,संसार,छायाचित्रा,चंद्रफूल, मी दिवाणी,आत्मीय इ.
बाल साहित्य—-
इच्छामणी आणि इतर गोष्टी, बरं का गं आई,माझाभारत,माणिकमोती, हसू बाई हसू इ.
अन्य—
अंजू..संपादित पत्रसंग्रह
ट्युलिप्सच्या देशातून..संपादित पत्रसंग्रह.
मराठी साहित्य दर्शन…ललित लेखन दहा भाग.
ध्वनिमुद्रित गीते—-
विठ्ठला,आळविते मी तुला, सत्यात नाही आले, हसतिल मजला कबीर मीरा, शांत सागरी कशास उठविलीस वादळे, या गडे हासू या इत्यादी
बरं का गं आई आणि हसू बाई हसू या काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत.
एक एप्रिल 2000 रोजी संजीवनी मराठे यांचे निधन झाले.
राजा मंगळवेढेकर,विजया जहागिरदार व संजीवनी मराठे या तिनही साहित्यिकांचे निधन वेग वेगळ्या वर्षी पण एक
एप्रिललाच झाले आणि हे तिघेही बालसाहित्याशी निगडीत होते.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया. मराठीसृष्टी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈