श्रीमती उज्ज्वला केळकर

? १ डिसेंबर –  संपादकीय  ?

आज दादा धर्माधिकारी, वामन चोरघडे, आणि गं.बा.सरदार  या तिघांचा स्मृतिदिन।

दादा धर्माधिकारी यांचा जन्म मध्य प्रदेशातील बैतुल इथे १८८९ मधे झाला. ते गांधीवादी विचारवंत होते. भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला.त्यांना दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागा. ते परिवर्तनवादी विचारसरणीचे होते. चळवळीत  गेल्यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.त्यांना कॉलेजची पदवी नव्हती पण त्यांचे वाचन उदंड होते. हिन्दी, संस्कृत, मराठी, बंगाली , गुजराती, इंग्रजी ग्रंथांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. ते चांगले लेखक होते. हिन्दी, मराठी आणि गुजरातीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.

दादांच्या बोधकथा – भाग १ ते ३, तरुणाई, दादांच्या शब्दात दादा भाग १ व २ (आत्मचरित्र) ,प्यिय मुली, मैत्री, क्रांतिवादी तरुणांनो, स्त्री- पुरुष सहजीवन इ, त्यांची मराठीत पुस्तके आहेत. त्यांच्या कार्यावरही पुस्तके  लिहिली गेली आहेत.

दादा धर्माधिकारी जीवंदर्शन, विचारयोगी दादा धर्माधिकारी, स्नेहयोगी दादा धर्माधिकारी ही पुस्तके तारा धर्माधिकारी यांनी संपादित केली आहेत.

☆☆☆☆☆

वामन चोरघडे यांचा जन्म नागपूरयेथील नरखेड इथे १६ जुलै १९१४ मध्ये झालात्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मॉरिस कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी अम्मा नावाची लघुकथा लिहिली. त्यांच्या कथा वागेश्वरी, सत्यकथा, मौज इ. दर्जेदार नियतकालिकातून प्रकाशित झाल्या.

वर्धा व नागपूर येथील जी.एम. कॉलेज येथे  त्यांनी अध्यापन केले. प्राध्यापक ते प्राचार्य असा त्यांचा व्यावसायिक प्रवास झाला. मराठी साहित्य आणि अर्थशास्त्र यात त्यांनी पदवी घेतली होती .स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. त्यांनाही दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला.

वामन चोरघडे यांचे प्रकाशित साहित्य –  

असे मित्र अशी मैत्री , देवाचे काम – बालसाहित्य, जडण-घडण –आत्मचरित्र (१९८१) चोरघडे यांची कथा – (१९६९), ख्याल, साद, सुषमा, हवन, पाथेय, प्रदीप, प्रस्थान, यौवन इ. त्यांचे कथासंग्रह आहेत. याशिवाय, वामन चोरघडे  यांच्या निवडक कथा भाग१ व २ , संपूर्ण  चोरघडे (१९६६) इ. त्यांचे कथासंग्रह आहे.

विदर्भ साहित्य संघाचे ते अध्यक्ष होते. १९७९ साली चंद्रपूर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

☆☆☆☆☆

 गं.बा.सरदार यांचाही आज स्मृतिदिन. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती वाचा याच अंकात.

 

या तीनही साहित्य श्रेष्ठींच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. ?

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २. इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments