श्रीमती उज्ज्वला केळकर
२१ जानेवारी – संपादकीय
माधव भास्कर आचवल
माधव भास्कर आचवल हे वास्तुशास्त्रज्ञ होते, तसेच मराठीतले एक चांगले लेखकही होते. ते काही काळ महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ बडोदा येथे प्राध्यापक होते. त्यांचे ललित लेखन ‘सत्यकथा’ मध्ये सुरुवातीला छापून आले. निसर्गातील, तसेच मानवनिर्मित कलाकृतींचा आस्वाद घेणारे रसिक मन त्यांच्यापाशी होते. जगण्यातील चैतन्यशीलता कवेत घेणारी संवेदनशीलता त्यांच्यापाशी होती. सौंदर्यासक्त, आनंदी वृत्तीचा प्रत्यय त्यांच्या ललित लेखनातून येतो. उत्कटता, सळसळता उत्साह, यांच्यासह जगण्याची उर्मी, प्रसंन्नता, निरागस खेळकरपणाहे गुण त्यांच्या ललित लेखनात दिसतात. चिंतनशीलता, कठोर विश्लेषण, जगण्यातील मार्दव, कारुण्य यांची जोपासना आशा दोन अंगांनी झालेला विकास त्यांच्या लेखनातून दिसून येतो. त्यांचा जन्म ३ नोहेंबर १९३६चा, वाङ्मय आणि कला या त्यांच्या पुस्तकात. त्या वेळची विश्राम बेडेकर यांची गाजलेली कादंबरी ‘रणांगण’ आणि ‘ताजमहाल’ या जगप्रसिद्ध वास्तुशिल्पाचे रसग्रहण आहे. ’जास्वंद’ या त्यांच्या समीक्षेच्या पुस्तकात गंगाधर गाडगीळ, इंदिरा संत, पु. शि. रेगे, चिं. त्र्यं. खानोलकर, जी.ए.कुलकर्णी यांच्या साहित्य कृतींवर केलेली समीक्षा प्रसिद्ध आहे.
मर्ढेकरांच्या नंतरच्या काळात नवसमीक्षेच्या प्रवाहातील समीक्षक म्हणून माधव आचवल यांचे नाव आदराने घेतले जाते.
माधव आचवल यांचे प्रकाशित साहित्य-
१. पत्र, २. रसास्वाद: वाङ्मय आणि कला, ३. डार्करूम आणि इतर एकांकिका, ५. चिता आणि इतर एकांकिका, ६. अमेरिकन चित्रकला (अनुवादीत)
कीमया आणि प्रदक्षिणा- भाग २ ( मराठी साहित्याचा इतिहास ) या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले.
आज त्यांचा स्मृतिदिन. (२१ जानेवारी १९८०) या निमित्याने माधव आचवल या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वास मन:पूर्वक श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
शानदार