श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २१ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मोरेश्वर रामचंद्र वाळिंबे, तथा मो.रा. वाळिंबे यांचा जन्म ३०.जून १९१२चा.            

ते शिक्षणतज्ज्ञ, मराठी भाषेचे व्याकरणकार होते. ‘मराठी लेखनपद्धती’ या विषयवावरची त्यांची अनेक पाठ्यपुस्तके आहेत. महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये त्यांनी शिक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक म्हणून काम केले. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात मराठी भाषेचा शब्दकोश करायचे कामही त्यांनी केले. मराठी साहित्यात त्यांना रस होता. खांडेकर, फडके., माडगूळकर, मालतीबाई बेडेकर इये. दिग्गज लेखकांशी त्यांचा संपर्क होता.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळासाठी इ. ५वी, ६वी, ७वी व्याकरणविषयक पुस्तकाचे लेखन, सुगम मराठी शुद्धलेखन व  सुगम मराठी व्याकरण या  पुस्तकाचे लेखन केले.

वनाराणी एल्सा या बालसाहित्याच्या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला. मराठी शुद्धलेखन प्रदीप हे पुस्तक लिहिले. त्यांच्या सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाची ५१ वी आवृत्ती२०१६मध्ये प्रकाशित झाली. या आधी त्यांच्या कन्येने ब्रेलमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून दिले.

याखेरीज आंग्ल भाषेचे अलंकार, श्री बाळकृष्ण यांचे चरित्र, सुबोध वाचन (३भाग), शिकरीच्या सत्यकथा याही पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.

पांडुरंग लक्ष्मण ऊर्फ बाळ गाडगीळ यांचा जन्म २९ मार्च १९२६ मधला.

बाळ गाडगीळ पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य होते, तसेच सिंबायसिस संस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यांनी विनोदी लेखन केलेच, त्याचबरोबर आर्थशास्त्रीय लेखनही केले. त्यांनी अनुवादही केले. गाडगीळ यांनी ६०हून अधीक पुस्तके लिहिली. त्यांनी विनोदी कथा, कादंबर्याक, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्रे, टीकाग्रंथ, भाषांतर, बालवाङ्मय असे विविध स्वरूपाचे लेखन केले.

बाळ गाडगीळ यांची काही पुस्तके –

१. अखेर पडदा पडला, २. अमेरिकेत कसे मारावे, ३. लोटांगण, ४फिरकी, ५. वाशिल्याचं तट्टू , ६ आकार आणि रेषा, ७. आम्ही भूगोल घडवतो, ८ उडती सतरंजी, ९. एक चमचा पु.ल. एक चमचा अत्रे  १०. गप्पागोष्टी –भाग ५ ११. सिगरेट आणि वसंत ऋतु (प्रवास वर्णन ), १२ वळचणीचे पाणी ( आत्मचरित्र)   

बाळ गाडगीळयांना मिळालेले सन्मान व पुरस्कार

१.    ‘लोटांगण’ या त्यांच्या पहिल्या विनोदी संग्रहास राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.  

२.    सिगरेट आणि वसंत ऋतु या प्रवास वर्णनास राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले.

३.    बडोदे येथे झालेल्या मराठी वाङ्मय परिषदेचे ते अध्यक्ष होते.,

४.    मुंबईत ९२मध्ये झालेल्या विनोदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

५.    कोथरूडमध्ये १९९५मध्ये झालेल्या कोथरूड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.,

गोविंद तळवलकर

गोविंद तळवलकर यांचा जन्म २२ जुलै १९२५ रोजी झाला. इंग्रजी आण मराठी दोन्ही भाषेत त्यांनी पत्रकारिता केली. त्याचप्रमाणे या दोन्ही भाषेत लेखन केले. अग्रलेखांकरिता ते विशेष परिचित होते. त्यांना अग्रलेखांचे बादशहा म्हणत. ते स्तंभलेखक होते. सामाजिक, राजकीय, अंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते भाष्यकार होते, तसेच ते साक्षेपी संपादक होते.

लोकसत्तामध्ये १२ वर्षे त्यांनी उपसंपादकाचे काम केले. त्यानंतर २८ वर्षे ते महाराष्ट्र टाईम्सचे संपादक होते. महाराष्ट्र टाईम्सला एक प्रभावी व परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

टाईम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड विकली, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, फ्रंटलाईन मॅगेझिन अशा इंग्रजी वृत्तपत्रातून आणि साप्ताहिकातून त्यांनी लेखन केले. ‘एशियन एज’ साठी ते अमेरिकेतून लिहीत असत.  

गोविंद तळवलकरांचे बरेचसे लेखन पुस्तक रूपातही आहे. लो.टिळकांची परंपरा जपणारे , संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे असे त्यांचे लेखन होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आण प्रचंड व्यासंग याच्या बळावर अग्रलेखांना त्यांनी खूप उंचीवर नेले. माडगूळकरांनी त्यांचा उल्लेख ‘ज्ञानगुण सागर’ असा केला होता.

गोविंद तळवलकरांची एकूण २५ पुस्तके आहेत. त्यापाकी काही निवडक पुस्तके –

१. अग्नीकांड, २ अग्रलेख, ३.अफगाणिस्तान, ४. अभिजात, ५. अक्षय, ६. ग्रंथसांगाती, ७. नवरोजी ते नेहरू  ८. परिक्रमा, ९. पुष्पांजली १०. (व्यक्तिचित्रे आणि मृत्यूलेख संग्रह) ११. मंथन १२. वाचता वाचता ( पुस्तक परीक्षणांचा संग्रह), १३. सौरभ साहित्य आणि समीक्षा 

पुरस्कार

१.    उत्कृष्ट पत्रकारितेचे दुर्गा रतन व रामनाथ गोयंका

२.    लातूर – दैनिक एकमत

३.    न.चि.केळकर पुरस्कार – सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त या पुस्तकासाठी

४.    जीवनगौरव पुरस्कार २००७

५.    महाराष्ट्र सरकारचा लो. टिळक पुरस्कार

६.    सामाजिक न्यायाबद्दल  रामशास्त्री पुरस्कार

आज मो.रा. वाळिंबे, बाळ गाडगीळ, गोविंद तळवलकर या मराठी भाषेतील वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणार्या. दिग्गजांचा स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments