श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २३ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
यशवंत पाठक :
संत साहित्याचे अभ्यासक व लेखक श्री.यशवंत पाठक यांनी मराठी व संस्कृत भाषा घेऊन एम्. ए. केल्यानंतर ‘कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य’ या विषयामध्ये डाॅक्टरेट
संपादन केली.मनमाड येथील महाविद्यालयात प्रदीर्घ काळ अध्यापनाचे काम केले.
धार्मिक विषयावरील लेखनाव्यतिराक्त कथा,कादंबरी,ललित असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले.त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.चतुरंग,डाॅ.
निर्मलकुमार फडकुले,संत ज्ञानेश्वर,संत विष्णूदास कवी अशा पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.महाराष्ट्र राज्य सरकारचा त्यांना तीन वेळेला साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.जळगाव येथे भरलेल्या दहाव्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच नाशिक येथे 2013मध्ये झालेल्या सावरकर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
श्री.पाठक निर्मित ग्रंथ संपदा:
धार्मिक–अंतरीचे घाव,कैवल्याची यात्रा,नाचू किर्तनाचे रंगी,निरंजनाचे माहेर,पहाटसरी
कथा– चंदनाची पाखरं,आभाळाचं अनुष्ठान
कादंबरी– ब्राह्मगिरीची सावली, संचिताची कोजागिरी
लेखसंग्रह–आनंदाचे आवार,चंद्राचा एकांत,मोहर मैत्रीचा.
यशवंत पाठक यांचा आज स्मृतीदिन आहे.त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈