श्रीमती उज्ज्वला केळकर
२५ जानेवारी – संपादकीय
प्राचार्य मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर
प्राचार्य मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर हे मुळचे हातकणंगल्याचे. हे मराठीतील नावाजलेले समीक्षक होते. त्यांचा जन्म १फेब्रुवारी १९२७ला हातकणंगले येथे झाला. सांगली ही त्यांची कर्मभूमी. त्यांचे अध्यान आणि अध्यापन दोन्हीही सांगलीत झाले. त्यांनी पुढच्या काळात अनेक लेखक घडवले. विश्वास पाटील, राजन गवस, दादासाहेब मोरे , ही त्यातील काही महत्वाची नावे. त्यावेळी नवोदित असणारी, नामदेव माळी, दिलीप शिंदे, चैतन्य माने दयासगर बन्ने अशा अनेक नवोदितांना लिहिते केले.
मराठीतील अक्षर वाङ्मय इंग्रजीत अनुवादीत करून त्यांनी मराठीचे स्थान देशात आणि जागतिक पातळीवर उंचावायचे काम केले. महाराष्ट्राच्या बाहेरच्या भारताला आणि जागतिक विश्वाला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची आहे.
हातकणंगलेकर वास्तविक इंग्रजीचे प्राध्यापक पण त्यांचा मराठी व्यासंग दांडगा. त्यातूनच त्यांच्या ललित लेखनाला प्रारंभ झाला. पुढे ते समीक्षात्मक लेखन करू लागले. नवभारत, वसंत, वीणा, महाद्वार इ. नियतकालिकातून त्यांचे लेखन गाजू लागले. सुप्रसिद्धा लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. पुढच्या काळात त्यांच्याशी जी. एंचा झालेला पत्रव्यवहार ४ खंडात त्यांनी प्रकाशित केला आहे.
नंतर त्यांनी अनेक इंग्रजी कथांचा मराठीत अनुवाद केला. तर गो. नि. दांडेकर यांच्या ‘माचीवरील बुधा’ व व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘सती’ या कादंबर्यांंचे इंग्रजीत अनुवाद केले.
त्यांनी समीक्षा केलेल्या अनेक कादंबर्यां आणि साहित्याबद्दल त्यांनी मांडलेली मते ठाम आणि परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्या समीक्षेला मराठी साहित्यात चांगले वजन प्राप्त झाले.
म. द. हातकणंगलेकर यांनी साहित्य संस्कृतिक मंडळ तसेच विश्वकोश मंडळावर अनेक वर्षे काम केले..
म. द. हातकणंगलेकर यांचे प्रकाशित साहित्य —
समीक्षा – १. साहित्यातील अधोरेखिते २. मराठी साहित्य प्रेरणा आणि प्रवाह ३. निवडक मराठी समीक्षा ४. मराठी कथा रूप आणि परिसर ५. साहित्य विवेक
ललित – १. आठवणीतील माणसं, २. भाषणे आणि परीक्षणे, ३. उघड झाप (आत्मचरित्र ) ४. विष्णु सखाराम खांडेकर
संपादन – १. जी. एंची निवडक पत्रे ( १-४ खंड), २. वाङ्मयीन शैली आणि तंत्र, ३. निवडक ललित शिफारस
गौरव – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन -८१ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फेब्रुवारी (२००८)
या प्रसगी केलेल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाली होते, ‘या साहित्य संमेलनाचे वेळी विद्रोही अगर समांतर संमेलनाचा विषय गाजतो, होणारे संमेलन हे सर्व घटकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक असावे. विद्रोही साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. मराठी साहित्यातील अनेक चुकीच्या प्रथांवर व चुकीच्या परंपरांवर त्यांनी प्रहार केला.
२. ‘सांगली भूषण’ पुरस्कार ( ३१ डिसेंबर २०१४ )
आज म. द. हातकणंगलेकर यांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने त्यांच्या विद्त्तेला सादर वंदन
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈