श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २९ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
निर्मलकुमार फडकुले
निर्मलकुमार फडकुले हे मराठीतील संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ललित लेखक व आस्वादक समीक्षक होते. सोलापूर येथे जन्मलेल्या फडकुले यांनी ‘लोकहितवादी: काल आणि कर्तृत्व’ हा प्रबंध सादर करून डाॅक्टरेट प्राप्त केली. लेखनाबरोबरच ते एक उत्तम वक्तेही होते.
त्यांनी काही काळ नांदेड येथे प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी स्विकारली व तेथूनच निवृत्त झाले.
फडकुले यांची साहित्य संपदा:
अमृतकण कोवळे,आनंदाची डहाळी,काही रंग काही रेषा,चिंतनाच्या वाटा,परिवर्तनाची चळवळ,मन पाखरू पाखरू,संतकवी तुकाराम -एक चिंतन,संत वीणेचा झंकार इत्यादी.
संपादित साहित्य :
अमृतधारा, चिपळूणकरांचे तीन निबंध, आदित्य आणि शुभंकर नियतकालिके, प्रबोधनातील पाऊलखूणा, रत्नकरंड श्रावकाचार, ज्ञानेश्वरी प्रथमाध्याय.
फडकुले यांनी आपल्या व्याख्यानांतून डाॅ.आंबेडकर,म.फुले,स्वा. सावरकर, ना.सि.फडके, प्र.के.अत्रे इत्यादी व्यक्तिंचे कार्य ओघवत्या भाषेत विषद केले आहे.
सोलापूर येथील भैरूरतन दामाणी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. 1986मध्ये नाशिक येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते .
वयाच्या 78 व्या वर्षी 29/7/2006 ला त्यांचे निधन झाले.
☆☆☆☆☆
सखाराम हरी देशपांडे
शिरवळ येथे जन्मलेल्या स.ह.देशपांडे यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बी.ए.पूर्ण केले.नंतर मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्रात एम्.ए. व डाॅक्टरेट संपादन केली.
राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता.त्याचबरोबर कृषी अर्थशास्त्र या विषयांत त्यानी अध्यापन व लेखन केले आहे.
भारतीय एकात्मता केंद्र, ज्ञानप्रबोधिनी पुणे या संस्थेचे ते काही काळ प्रमुख होते. ग्रामायन, पुणे चे ते संस्थापक सदस्य होते. सातव्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ते अध्यक्ष होते. लेखनाबरोबरच त्यांनी आदिवासी आणि दलित समाजात सहकारी शेती चे उपक्रम राबविले.
स.ह.देशपांडे यांचे साहित्य:
अमृतसिद्धी भाग 1 व 2
आर्थिक प्रगतीचे रहस्य:भारतीय शेती
आर्थिक विकासाच्या पाय-या
काही आर्थिक,काही सामाजिक
किबुटझ:नवसमाज निर्मितीचा एक प्रयोग
दुभंग,
भारताचा राष्ट्रवाद
हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व
हिंदुत्वाची फेरमांडणी इत्यादी.
29/07/2010 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
श्री.निर्मलकुमार फडकुले व स.ह.देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, मराठीसृष्टी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈