सौ. उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ३१ जुलै -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्रीपाद दामोदर सातवळेकर (१९ सप्टेंबर १८६७ – ३१ जुलै १९६८ )
श्रीपाद दामोदर सातवळेकर हे संस्कृत पंडीत होते. वेदांचे अभ्यासक आणि संशोधक होते. वैदिक तत्वज्ञानाचे भासयकार आणि मराठी लेखक होते. ते उत्तम चित्रकारही होते.
सातवळेकर यांनी ‘वैदिक राष्ट्रगीत’ आणि ‘वैदिक प्रार्थनांची तेजस्वीता’ या नावाचे लेख लिहिले होते. त्यासाठी इंग्रज सरकारने त्यांना कारावासात पाठविले होते. सातवळेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील कोलगाव इथे झाला, तर मृत्यू गुजराठेतील पारडी या गावी झाला. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् इथे त्यांचे चित्रकलेचे शिक्षण झाले. कीर्तिवंत चित्रकार माधव सातवळेकर त्यांचे सुपुत्र.
सातवळेकर यांचे धर्मविषयक विचार –
धर्माला मर्यादा नाही. जेथे मानव आहे, तेथे धर्म असतोच. वेद-उपनिषदे, रामायण-महाभारत, या ग्रंथातून दिसणारी आपली सस्कृती जगावर प्रभाव टाकणारी आहे. ती जागती ठेवणं आवश्यक आहे. उपनिशादातील विचार प्रत्येक अवस्थेत मनुष्याला शांती, श्रेष्ठ आनंद व असीम धैर्य देतात.
पं. सातवळेकर यांची ४०० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील काही निवडक पुस्तके –
१. अथर्व वेद संहिता, २. ऋग्वेद संहिता, ३. ईश उपनिषद, ४. गृहस्थाश्रम , ५. जीवनप्रकाश, ६. दीर्घ जीवन आणि आरोग्य , ७. पौराणिक गोष्टींचा उलगडा , ८. भगवद्गीता – निबंधमाला (अनेक भाग ), ९. वेदामृत , १० सामवेद
त्यांच्यावर वेदव्यास पंडीत सटवलेकर हे पुस्तक पु. पां. गोखले यांनी लिहिले आहे.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈