श्रीमती उज्ज्वला केळकर
३ नोव्हेंबर – संपादकीय
माधव आचवल-
माधव आचवल हे सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक चित्रकार, वास्तु शिल्पकार. त्यांचे ललित लेखन प्रामुख्याने ‘सत्यकथेतून प्रकाशित झाले. ‘किमया –ललित, पत्र- ललित, रसास्वाद – ललित . जास्वंद – समीक्षा, डार्करूम आणि इतर एकांकिका, चिता आणि इतर एकांकिका ,अमेरिकन चित्रकला – (अनुवादीत) इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 3 नोहेंबर 1926 हा त्यांचा जन्मदिन.
*अनंत फंदी (१७४४- १८१९ )
पेशवाईच्या उत्तर काळात गाजलेल्या शाहीरांमधे अनंत फंदी सर्वात जेष्ठ शहीर. त्यांचे आडनाव घोलप. अनंत फंदीबद्दल शाहीर होनाजी बाळाने लिहून ठेवले आहे,
‘फंदी अनंत कवनाचा सागर . समोर गाता कुणी टीकेना’. पण या कावणाच्या सागरातील आज थोडीच कवणे उपलब्ध आहेत. आज त्यांचे ७ पोवाडे, ८ लावण्या व काही फटाके उपलब्ध आहेत. पदे, लावण्या , कटाव, फटाके इ. विविध प्रकारच्या रचना त्यांनी केल्या. त्यांच्या रचना रसाळ आणि प्रासादिक आहेत. उत्तर आयुष्यात त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या सांगण्यावरून कीर्तन करायला सुरवात केली, असे म्हणतात. त्यांचा आपल्या पर्यन्त पोचलेला लोकप्रिय फटका म्हणजे
‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको
संसारामधे ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको.’
हा उपदेशपर फटका. व्यवहारत कसे वागावे, हे अनंत फंदी यातून सांगतात. सालसपणाने वाग, खोटे बोलू नको,अंगी नम्रता असावी, कुणाचे वर्म काढू नको,दुसर्याचा ठेवा बुडवू नको, गर्व करू नको. पाइजेचा विदा उचलू नको, हरिभजनाला विसरू नको इ. व्यवहारात कसे वागावे याचा उपदेश त्यांनी यातून केला आहे.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈