इंद्रधनुष्य
☆ केतकी जानी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆
आज एका अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्त्वाला पाहण्या भेटण्या, ऐकण्याचा योग मैत्र या आमच्या ग्रुप मुळे आला! मूळ अहमदाबादच्या पुण्यात नोकरी करणाऱ्या दोन मुलांच्या आईचे केस अचानक जाऊ लागतात. ऍलोपेशिया असे निदान होते. steroids मुळे 85 kg वजन झाले. पूर्ण केस गेल्याने विद्रुपता आली. लोकांच्या नजरा, प्रश्नोत्तरे, केविलवाणी मुले, सतत विग किंवा स्कार्फ वापरणे याने जेरीला आली. लोकांना कॅन्सरची शंका येई! तुमची आई वारणार सोसायटीतील मुले हिच्या मुलांना म्हणत! नैराश्यात जाऊन स्टूल, दुपट्टा असा सरंजाम पंख्याखाली मांडला आणि समोरच्या खोलीत झोपलेल्या मुलांकडे पाहून विचार बदलला आणि ती पण आमूलाग्र बदलली!
दुसऱ्या दिवशी विग फेकून दिला, स्कार्फ टाकून दिला! लोकांच्या नजरा चुकवण्यासाठी, प्रश्न टाळण्यासाठी वेळेआधी ऑफिसला पोचून वेळेनंतर बाहेर पडणारी ताठ मानेने, आनंदी चेहऱ्याने वेळेत ऑफिसला पोचू लागली, बाहेर पडू लागली.
मी जशी आहे तशीया भावनेने स्वतःवर प्रेम करू लागली! पूर्ण लाईफ स्टाईल बदलली. आहार, व्यायाम, योगा, सकारात्मकता यांची कास धरली! नवी क्षेत्रे, यशाच्या वाटा खुणावू लागल्या.
मॉडेलिंग ला निवड झाली आणि मागे वळून पाहिले नाही बालभारती मधील नोकरी आणि शनि रवि मॉडेलिंग!
Mrs Universe 2018
Mrs Confidence
अशी खूप खूप बक्षिसे मिळवली!
सकारात्मक आणि आनंदी वृत्तीने आपले न्यून मागे टाकून पाय रोवून आयुष्यात उभी राहिली! केसांविना डोक्यावर अपार वेदना सोसून पूर्ण गोंदवून घेतले.
तिचा जन्म झाल्यावर आजी म्हणाली पत्थर जन्मला!
मुलगा मोठा झाल्यावर म्हणाला , आजीला कळले नाही तो हिरा होता!
उपेक्षित आणि खडतर गेलेल्या बालपणाने पुढचे आघात ती झेलू शकली!
तिच्यासारख्या स्त्रियांसाठी आधार गट स्थापन करायचा तिचा मानस आहे.
‘अग्निजा’ तिच्या आयुष्यावर आधारित पुस्तक गुजराती भाषेत प्रसिद्ध झाले आहे. ते अनेकांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
संग्राहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप सुंदर, सकारात्मक लेख