सुश्री मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ तूप… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
तूप
जेवण कसलेहि असो, पंगतीला ,,तूप,, वाढले कि,मगच जेवायला सुरवात करायचि, आपलि परंपरा आहे. एकंदरित तूप हा अविभाज्य घटक आहे.
(१) जुन्या काळात युद्ध लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठि, तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारि.
(२) घ्रूत,अज्या, घि, हवि, सर्पि वैगेरे विविध नावाने तुपाला संबोधल्या जाते. तुप मधुर, अत्यंत बलवान, थंड , पित्तशामक, मेद मज्जा, शुक्र धातूंचे पोषण करणारे आहे.
(४) तुपामुळे स्मुर्ति, बुद्यि, आदिंचि वाढ होते. तूपाचे वैशिष्ट्य हे कि, तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तूपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे।
(५) तूपामूळे स्वरयंत्र सुधारते. आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाहि व रसायन गुणधर्माचे आहे.
(६) तूप कोणत्याहि रोगांत, विशेषतः वात-पित्त-कफ विकारांत वापरता येतं आयुर्वेदांत अनेक औषधि द्रव्ये तूपात सिद्ध करून त्यांचे औषधे बनवलि आहेत.
(७) डोके दुखत असेल तर, तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत. किंवा दुखर्या कपाळावर हलकेच मालिश करावि.
(८) १०० वेळा धुतलेले (शतधौत घ्रुत) तुप त्वचाविकार, जखमांवर, अंगाला खाज, टाचा फुटणे, अंग फुटणे, या विकारात गुणकारि आहे.
(९) तूप किंचित कोमट करून खाल्ल्यावर उचकि थांबते. रात्रि झोपतांना एक पेलाभर दूधांत एक चमचा तूप टाकून प्यायल्यास सकाळि पोटाचा कोठा मोकळा होतो. बद्धकोष्ठ, मुळव्याध बरि होते.
(१०) तुपामुळे मेद, चरबि वाढते हि समजूत चुकिचि आहे. नेहमि जे हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात, त्यांनि अवश्य तुप खावे.
(११) कँसरच्या रूग्णाला तूप म्हणजे अम्रूतासमान.. कारण तूपात कँसरच्या पेशिंचि वाढ थांबवण्याचि शक्ति आहे.
तेव्हा अश्या बहुगुणि तुपाला आहारात श्रेष्ठ स्थान आहे च….
संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२