मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ थोडक्यात..पण महत्त्वाचे ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ इंद्रधनुष्य ☆ थोडक्यात..पण महत्त्वाचे ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

एका वर्षाचे महत्त्व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला विचारावे, एका महिन्याचे महत्त्व मातृत्वाच्या वाटेवर असलेल्या महिलेला विचारावे, एका सप्ताहाचे महत्त्व साप्ताहिकाच्या संपादकास विचारावे,एका दिवसाचे  महत्त्व मजुरी न मिळालेल्या मजुरास विचारावे, एका तासाचे महत्त्व आपले अर्धे राज्य देऊन एक तास मृत्यू लांबविण्याचा आग्रह धरणाऱ्या सिकंदराला विचारावे, एका मिनिटाचे महत्त्व वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळण्याच्या एक मिनिट आधी सुरक्षितपणे बाहेर पडणाऱ्या भाग्यवंताला विचारावे आणि एका सेकंदाचे महत्त्व केवळ एका सेकंदामुळे सुवर्णपदक न मिळू शकलेल्या ऑलिंपिकमधील धाव स्पर्धकाला विचारावे.

 

संग्राहक – श्रीमती अनुराधा फाटक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈