सुश्री सुलू साबणे जोशी
इंद्रधनुष्य
☆ रशियन कलाकारांची रामलीला… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
1960 मध्ये रशियन कलाकार गेनाडी मिखाईलोविच पेचिन्कोव याने पहिल्यांदा प्रभू रामचंद्र साकारला आणि पुढे चाळीस वर्षं त्याने श्रीराम म्हणून रशिया व युरोपातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रशियात आणि जवळपासच्या देशांत रामायण पोचवण्याचं काम त्यांनी चोख बजावलं. भारत सरकारकडून २००६ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं गेलं. २०१८ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
गेली काही वर्षं योगींचं भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अयोध्येतील दीपोत्सव आपल्या डोळ्यांचं पारणं फेडत आहे. २०१८ मध्ये अयोध्येत पहिल्यांदाच रशियन कलाकारांनी रामलीला सादर केलेली आणि नंतर २०१९ च्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यात.
यंदाच्या दिवाळीत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी २३ ऑक्टोबरला अयोध्येतील दीपोत्सवात भाग घेतला आणि रशियन कलाकारांनी साकारलेली रामलीला पाहिली.
मर्यादा पुरुषोत्तम राम साकारला आहे इल्दार खुस्नुलिस याने, तर सुकुमार सीतामाई आहे मिलाना बायचोनेक. अलेक्सेई फ्लेयिन्कव बंधुप्रेमामुळे रामचंद्राबरोबर गेलेला लक्ष्मण झाला आहे, ज्यांचा फोटो आपण येथे पहात आहोत.
लेखक – अज्ञात
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈