इंद्रधनुष्य
☆ नालंदा… ☆ प्रस्तुती – सुश्री अनिता पारसनीस ☆
तुर्की शासक बख्तियार खिलजीने भारतावर आक्रमण केले. या दरम्यान खिलजी आजारी पडला. त्याच्या बरोबरच्या हकीमांचं औषध लागू पडेना. मग त्याला नालंदा विश्वविद्यालयातील आयुर्वेद विभागाचे प्रमुख आचार्य – राहुल श्रीभद्र यांचेकडून उपचार करून घ्यावेत, असा सल्ला मिळाला.
त्याने आचार्यांना बोलावून घेतले आणि दम भरला की, तो कोणतेही हिंदुस्थानी औषध घेणार नाही आणि ठराविक मुदतीत त्याचा आजार बरा झाला नाही तर तो आचार्यांचा वध करेल. आचार्यांनी त्याच्या सवयी जाणून घेतल्या. त्याचे नित्य पठणातील कुराण मागून घेतले आणि ते परत करतांना सांगितले की, खिलजीने रोज किमान एवढी पाने वाचलीच पाहिजेत. तसे केल्यावर खिलजी बरा झाला. *
आचार्यांनी औषधींचा लेप त्या कुराणातील पानांच्या कोप-यात लावून ठेवला होता. खिलजी सवयीने तोंडात बोट घालून, थुंकीने ओले करून, कुराणाचे पान उलटत असे. जेवढी मात्रा पोटात जाणे अपेक्षित होते, तेवढ्याच पानांना लेप लावलेला होता. *
पण या रानदांडग्याला हे कळल्यावर आपल्यापेक्षा हे हिंदु श्रेष्ठ कसे, या वैषम्याने त्याने सर्व गुरूवर्य आणि बौद्ध भिक्षूंची हत्या केली. संपूर्ण नालंदा विश्वविद्यालय जाळून टाकले. तिथले ग्रंथालय एवढे प्रचंड होते की, तीन महिने ते जळत राहिले होते. कृतघ्न खिलजीला प्राणदान मिळाल्याचा मोबदला त्याने असा चुकता केला.
आता आतापर्यंत तिथे मातीचे ढिगारे होते. भारतीय पुरातत्व खात्यातर्फे उत्खनन करायला सुरूवात केल्यावर त्याखाली दडलेले उध्वस्त अवशेष मिळून आले. तिथे गौतम बुद्धाची ८० फूट उंचीची मूर्ति होती, असे चिनी पर्यटक/विद्यार्थी ह्युएन त्संगने लिहून ठेवले होते.
गुप्त वंशातील कुमारगुप्ताने याची निर्मिती केली. “ नालंदा “ या शब्दाचा अर्थ -> ना + आलम् + दा :- “ न थांबणारा ज्ञानाचा प्रवाह“.
या अर्थाला जागणा-या आपल्या पंतप्रधानांनी – श्री.नरेंद्र मोदीजींनी याला पुनर्प्रस्थापित केले. || नमो नमो ||
१९८७ साली कौटुंबिक सहलीदरम्यान तिथे जाण्याचा योग आला, तेव्हा हे सगळे अवशेष पहाण्यात आले होते.
—जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी हा सूत्रधागा अवश्य पहावा. 👉 https://www.indiaolddays.com/naalanda-vishvavidyaalay-kisane-banavaaya-tha/?amp=1
संग्रहिका : सुश्री अनिता पारसनीस
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈