डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ ॥ जटायू शौर्यम् स्तोत्र ॥ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆मराठी भावानुवाद – रामायणम् अरण्यकांड : आदिकवी वाल्मिकी ☆
☆
सा गृहीता विचुक्रोश रावणेन यशस्स्विनी।
रामेति सीता दुःखार्ता रामं दूरगतंवने ।।१।।
हरण करता दशाननाने प्रख्यात जानकी सीतेचे
दुःख आर्त ती साद घातते दूर वनीच्या रामाते |। १ |]
☆
सा तदा करुणा वाचो विलपन्ती सुदु:खिता ।
वनस्पतिगतं गृध्रं ददर्शायतलोचना ॥२॥
रडताना कारुण्याने विशालाक्षी दुःखी सीतेने
वृक्षस्थ पहिले गृधराजाला अश्रू भरल्या नजरेने ||२||
☆
जटायो ! पश्य मामार्य !ह्रियमाणामनाथवत् ।
अनेन राक्षसेन्द्रेण करुणं पापकर्मणा ।।३॥
आर्य गृधेन्द्रा जटायू, पाही कारुण्याच्या दृष्टीने
कष्टी अनाथ सीतेला पळवून आणिले दशानने ||३||
☆
तं शब्दमवसुप्तस्तु जटायुरथ शुश्रुवे ।
निरीक्ष्य रावणं क्षिप्रं वैदेहीं च ददर्श स: ॥४॥
निद्रिस्त जटायू कानी पडता आर्त बोल ते दुःखाचे
नेत्र उघडता दर्शन झाले दशाननाचे वैदेहीचे ||४||
☆
तत: पर्वतशृङ्गाभस्तीक्ष्णतुण्ड: खगोत्तम: ।
वनस्पतिगत: श्रीमान् व्याजहार शुभां गिरम् ॥५॥
नग शिखरासम तीक्ष्ण चोच ती देई शोभा ज्याला
श्रेष्ठ खगेंद्र जटायू गृध सुंदर वाणी वदिता झाला ||५||
☆
निवर्तय मतिं नीचां परदाराभिमर्शनात् ।
न तत्समाचरेद्धीरो यत्परोऽस्य विगर्हयेत् ॥६॥
परनिंदेचे कारण ऐसे धैर्यवीरा तू न आचरी
परदारेच्या अभिलाषेची नीच बुद्धी ना मनी धरी ||६ |।
☆
वृद्धोऽहं त्वं युवा धन्वी सरथ: कवची शरी |
न चाप्यादाय कुशली वैदेहीं मे गमिष्यसि ॥७॥
कवचसिद्ध चापबाण घेउनी रथारूढ तू जरी
सीताहरणापासुनी तुजला रोखीन वृद्ध जरी ||७||
☆
तस्य तीक्ष्णनखाभ्यां तु चरणाभ्यां महाबल: ।
चकार बहुधा गात्रे व्रणान् पतगसत्तम: ॥८॥
द्विजश्रेष्ठ त्या गृधराजाने महाबली पक्षाने
रावण देहा जर्जर केले तीक्ष्ण नखांनी पायाने ||८||
☆
ततोऽस्य सशरं चापं मुक्तामणिविभूषितम् ।
चरणाभ्यां महातेजा बभञ्जास्य महद्धनु |।९|।
तेजोमय मग जटायुने मौक्तिकरत्नांच्या शस्त्रांना
चापबाण भंगून लीलया केले जर्जर दशानना ॥९॥
☆
ततः क्रोधाद्दशग्रीवो गृध्रराजमपोथयत् |
पक्षौ पार्श्वौ च पादौ च खड्गमुद्धृत्य सोच्छिनत् ||१०||
क्रोधित होऊनी चढाई केली जटायूवरी दशग्रीवाने
उभय पंख अन् चरण छाटले तीक्ष्ण अशा तलवारीने ||१०||
☆
स छिन्नपक्षः सहसा रक्षसा रौद्रकर्मणा ।
निपपात हतो गृध्रो धरण्यामल्पजीवितः ॥११॥
दुष्ट राक्षसे पंख कापता पक्षीराज झाला छिन्न
कोसळला झणी धरणीवरती होऊनिया मरणासन्न ||११||
☆
स भग्नधन्वा विरथो हताश्वो हतसारथि: ।
अङ्केनादाय वैदेहीं पपात भुवि रावण: ॥१२॥
भग्न चाप रथ विहीन रावण अश्व सारथी मृत ज्याचे
सीतेसह भूमीवर पडला त्राण जाउनी देहाचे ||१२||
☆
संपरिष्वज्य वैदेहीं वामेनाङ्केन रावण: ।
तलेनाभिजघानाशु जटायुं क्रोधमूर्च्छित: ॥१३॥
संतापाने धरून जानकी मुठीनेच तलवारीच्या
अखेरचा तो घाव घातला मुर्च्छित देही जटायुच्या ||१३||
☆
जटायुस्तमतिक्रम्य तुण्डेनास्य खगाधिप: ।
वामबाहून् दश तदा व्यपाहरदरिन्दम: ॥१४॥
वाम भुजांवर हल्ला करुनी अरिभंजक निज चोचीने
जर्जर केले दशबाहूंना दशाननाच्या त्वेषाने ||१४||
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈