इंद्रधनुष्य
☆ “राष्ट्रीय कर्क रोग संस्था, नागपूर”… लेखक – श्री सूरज पाल ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
नमस्कार ! दिनांक ८/ ०५/२०२३ ला राष्ट्रीय कर्करोग संस्था, नागपूर येथे गेलो होतो.
एखाद्या पंचतारांकित हॉटेलात जातोय की काय असाच भास आला !
दवाखान्याची इतकी भव्यता, अत्याधुनिक यंत्रणा आणि सुंदरता बघून खूप अभिमानस्पद वाटलं , की माझ्या देशात सुद्धा अश्याप्रकारचे दवाखाने तयार होत आहेत.
आम्हा सगळ्यांना खूप सुरक्षित आणि आरामदायक वाटले ! रुग्णालय अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित आहे! संपूर्ण कर्मचारी अतिशय ज्ञानी आणि मैत्रीपूर्ण आहेत ! खोली अतिशय स्वच्छ आणि आरामदायक आहे! दिलेले अन्न अतिशय पौष्टिक आणि चविष्ट होते ! एकूणच, मला खूप सकारात्मक अनुभव आला !
कर्करोग या संकटाशी लढण्यासाठी इथे ‘कर्कयोद्धा’ ची फौज तयार करत आहेत. दवाखान्याच्या मिशनमधील प्रत्येक भागधारक, मग तो रुग्ण, काळजीवाहू, नातेवाईक किंवा इथले सेवा सहयोगी– हा सुद्धा कर्कयोद्धा आहे.
कार्यक्षमता, टिकाऊपणा, ऊर्जा कार्यक्षमता, सुरक्षा आणि सौंदर्यशास्त्र या मूल्यांवर राष्ट्रीय कर्करोग संस्थेची योजना आखली आहे.—- कर्क योद्धा, परिवार शक्ती, कर्क सेवक, आंतरिक संगत, सबकी लडाई ह्या तत्वांवर चालणारी ही संस्था आहे.
आज तुम्हा सगळ्यांना ऊर्जा कार्यक्षमता या तत्त्वावर कश्या प्रकारे ही संस्था आधारित आहे? हे सांगण्याचा प्रयत्न करतो – हा प्रकल्प पूर्णपणे सौर उर्जेवर आहे. सौर ऊर्जेच्या प्लेट्स च्या खालच्या सावलीचा उपयोग काय करायचं?, तर तिथे गाड्या पार्क करण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तसेच त्या भागात फुलबाग सुद्धा फुलविली आहे. अश्या प्रकारे आम्ही ऊर्जा सुद्धा तयार करू – जागेचा पुनर्वापर करू – फुलबाग सुद्धा फुलवू, हेच तत्व अश्या प्रकारच्या कृतीतून दाखवून आपल्या सगळ्यांसमोर उत्तम उदाहरण ठेवलेलं आहे.
लेखक : श्री सूरज पाल
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈