☆ इंद्रधनुष्य : चुकतंय कुठेतरी… ☆ बिल्वा सुहास पंडित ☆
कधीतरी एक बदल म्हणून, मजा म्हणून किंवा गरज म्हणून “English Accent “मध्ये बोललो तर ठीक आहे
पण जेव्हा आपल्या रोजच्या बोलण्यात मराठी पेक्षा जास्त इंग्रजी शब्द येतील
समजायचं,
आपलं कुठेतरी चुकतंय…
कधीतरी एक बदल म्हणून, “Style” म्हणून “Western Dress Up” करायला ठीक आहे
पण जेव्हा हाच पोशाख आता “Comfortable” आहे असे म्हणलं जाईल
समजायचं,
आपलं कुठेतरी चुकतंय…
कधीतरी एक बदल म्हणून, जिभेचे चोचले पुरवायला “Pizza, Burger, Fastfood” खाल्ले तर ठीक आहे पण जेव्हा हेच आपले जेवण होऊन जाईल
समजायचं,
आपलं कुठेतरी चुकतंय…
आपल्या सगळ्यांनाच आपल्या “Professional Life” मध्ये इंग्रजी भाषेचा वापर कमी जास्त प्रमाणात करावा लागतो
पण जेव्हा मराठी लिहिताना ऱ्हस्व-दीर्घ, रफार नक्की कशावर द्यायचा असे प्रश्न पडतील
समजायचं,
आपलं कुठेतरी चुकतंय…
जे संस्कार आपले नाहीत, ती संस्कृती ही आपली नाही.
© बिल्वा सुहास पंडित
9421174255
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
आपल्या साहित्य चे स्वागत आहे.