डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त): ऋचा ५ ते ७ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त) – ऋचा ५ ते ७
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – इंद्र
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकोणतिसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी इंद्र देवतेला आवाहन केलेले असल्याने हे इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या पाच ते सात या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद :
☆
समि॑न्द्र गर्द॒भं मृ॑ण नु॒वन्तं॑ पा॒पया॑मु॒या ।
आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ५ ॥
कुत्सित बोलत अमुच्याविषयी अभद्र जे भाषा
अशा रासभा निर्दालुनिया जागृत ठेवी आशा
यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी
जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||५||
☆
पताति कुण्डृणाच्या दूरं वातः वनात् अधि ।
आ तु नः इंद्र शंसय गोषु अश्वेषु शुभ्रिषु सहस्रेषु तुवीऽमघ ॥ ६ ॥
वावटळीसी कोसो कोसो दूर घेऊनि जाई
काननाचिया पार नेऊनि पतन करोनी टाकी
यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी
जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||६||
☆
सर्वं॑ परिक्रो॒शं ज॑हि ज॒म्भया॑ कृकदा॒श्वम् ।
आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ७ ॥
समस्त दुःखांचा शोकांचा करुनी परिहार
अमुचा वैरी नाश करी त्याचा करी संहार
यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी
जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||७||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 5 – 7
Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 5 – 7
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈