इंद्रधनुष्य
☆ क्रोध जिंकायचा आहे ?… – डाॅ.सुरेश महाजन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
रशियात 90 ते 110 वर्षे वयाची 1कोटी लोक आहेत.…
सकाळी 5 वाजता उठुन….…
10 मिनिट मेडीटेशन
6 किलोमिटर फिरणे
अतिशय नियंत्रीत आहार..
खातांना आणि बोलतांना जिभेवर नियंत्रण. दैनंदिनी निर्व्यसनी
आणि आत्मविश्वास चिकाटी व नियोजन या शिदोरीवर हे रशियन औषधीची एक मात्रा/ गोळी न घेता द्रुष्ट लागावी असे आनंदी जीवन जगत आहेत.
या नास्तीक मंडळींना राग /क्रोध तिरस्कार द्वेष आणि अहंकार काय असतो हे संसारी असुनही माहीत नाही.
एका संमेलनापासून त्यांच्या सहवासात आलेल्या माझ्या सारख्या अनेकांचा हा अनुभव.
त्यांच्या मते क्रोध हा लुळा असतो.
राग हा पांगळा असतो …
जसे उकाड्याने शुध्द दुध नासते तसे क्रोधाने स्नेह/ प्रेम/ जीवन नासते…
या लोकांना मी बुद्धाचे / विवेकानंदाचे /ज्ञानेश्वरीचे/ रामायण/ महाभारत/ सर्व संतांचे तत्वज्ञान सांगितले त्यावर या वयोवृद्धांनी या सर्वांचा सार एका वाक्यात आम्हाला सांगितला…..
शांतीने रागाला..
नम्रतेने अभिमानाला..
सरळतेने मायेला
तसेच
समाधानाने लोभीपणाना जिंकले पाहिजे…
राग/ क्रोधावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे मौन..
विनय/संयमाचा त्याग केला की क्रोधाचा जन्म होतो.
नम्रतेच्या उंचीला माप नसते.
ज्याने क्रोध जिंकला त्याने सर्व जग जिंकले असे समजावे.
भारतात मात्र राग/क्रोध दुसर्यावर काढायचा असतो हे गृहीतचं धरले जाते… सर्वात मोठा अधिकारी सहकार्यावर रागावतो.
हे सहकारी खालच्या लोकांवर राग काढतात.
हे लोक घरी येऊन बायकोवर विनाकारण राग काढतात.
बायको लहान मुलांवर अकारण राग / क्रोध व्यक्त करते.
निष्पाप मुलं चकित होऊन ते सुध्दा तोचं राग खेळणीला मोडूनतोडून , रडून व्यक्त करतात….
म्हणुनच भारतात सर्वात जास्त खेळणी तयार करण्याचे कारखाने आहेत.
संपूर्ण युरोपात राग क्रोध तर नाहीच….
पण दिवसभर हे लोकं
Sorry.
Thank you.
Welcome किमान शंभरवेळा अगदीच आनंदाने म्हणतात…
याच्या उलट आपल्या कडे असते…
हे लोक देवपूजा कधीच करत नाही पण चोविस तास देशपुजा करतात…
परिणामी या देशावर गुलामगिरी कधीच आली नाही.
लंडन ते पॅरिस हा रेल्वेचा 790 किलोमिटरचा समुद्राखालुनचा दोन तासाचा प्रवास चालु असतांना अचानक आमच्या बोगीत दोन सुरक्षा महिला अतिशय नम्रपणे sorry म्हणून मला बाजूला खुर्चीच्या दिशेनं बसण्याची विनंती केली आणि मी बसलेल्या सीटवर एका मशीनद्वारे किंचित छिद्र पडलेली सीट … फक्त 2 मिनिटात शिऊन स्वच्छ करून आभार मानून अगदी आनंदाने Welcome म्हणून निघून गेल्या…
आपल्या कडे भारतात आपण एस टी ने /रेल्वेने प्रवास करतो. कागद/ कचरा/ थुंकी टाकून/ काही प्रसंगी सीट खराब करूनचं उतरतो आणि त्या जागी नविन प्रवाशांना Happy Journey प्रवास सुखाचा होवो म्हणुन शुभेच्छा देतो.
हि आहे गुलामगिरीत जगण्याची सवय असलेल्या भारतीयांची मनोवृत्ती….
आम्ही विमानतळावर पोहोचलो नंतर लक्षात आले की आपले मंगळसुत्र हरविले आहे.
विमानतळावर तक्रार केली.
एका तासात ऑटोरिक्षात पडलेले मंगळसुत्र आम्हाला अतिशय आनंदाने पोलीसांनी परत केले तेही त्यांनी आमची क्षमा मागून.
कारण आमच्या देशाची तुमच्या देशात कृपया बदनामी करु नये या एकच अपेक्षेने…
आपण भारतीय खुप हट्टी.
हट्ट ही क्रोधाची बहिण.
ती सदैव मानवासोबत असते.
क्रोधाच्या पत्नीचे नांव हिंसा.
ती सदैव लपलेली असते.
अहंकार क्रोधाचा मोठा भाऊ.
निंदा/ चुगली हया क्रोधाच्या आवडत्या कन्या.
एक तोंडाजवळ दुसरी कानाजवळ.
वैर हा क्रोधाचा सुपुत्र.
घृणा ही नात.
अपेक्षा ही क्रोधाची आई.
हर्षा (आनंदी) ही आपल्या परिवारातील नावडती सुन.
तिला या परिवारात स्थानच नसते.
प्रत्येक भारतीय हा या परिवाराचा पारंपारिक घटक…
परिवार त्याला सोडत नाही..
त्याला परिवाराला सोडवत नाही.
अहंकार सुखाने वाढतो..
दुःखाने कमी होतो..
अहंकारी (भारतीय) दुबळा असतो…
दुबळे (ते वयोवृद्ध रशियन) अहंकारी नाहीत….
… म्हणून नेहमी हसत रहा आनंदी रहा .
लेखक : डॉ सुरेश महाजन, मुंबई
मुंबई
माहिती संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈