डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय ४— ज्ञानकर्मसंन्यासयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ ४-२१ ॥
*
संयम ज्याचा चित्तेंद्रियांवर त्याग सकल भोगांचा
कर्म करितो सांख्ययोगी नाही धनी पापाचा ॥२१॥
*
यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ ४-२२ ॥
*
प्राप्त त्यावरी संतुष्ट भावद्वंद्वाच्या पार अभाव ईर्षेचा
सिद्धावसिद्ध समान कर्मयोगी बंध त्यास ना कर्मांचा ॥२२॥
*
गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ ४-२३ ॥
*
मुक्त आसक्ती नष्ट देहबुद्धी यज्ञास्तव केवळ कर्म
जीवनात आचरले तरीही विलीन होते त्याचे कर्म ॥२३॥
*
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ ४-२४ ॥
*
यज्ञी ज्या यजमान ब्रह्मरूप अर्पण ब्रह्म हवि ब्रह्म
ब्रह्मकर्मस्थित योग्यासी अशा फलप्राप्ती केवळ ब्रह्म ॥२४॥
*
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ ४-२५ ॥
*
देवतापूजनास काही योगी यज्ञ जाणती
तयात करुनी अनुष्ठान उत्तम यज्ञ करिती
अभेददर्शन परमात्म्याचे कोणा होई अग्नीत
आत्मारूप यज्ञाचे ते यज्ञाद्वारे हवन करित ॥२५॥
*
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ ४-२६ ॥
*
हवन करिती कर्णेंद्रियांचे संयमाच्या यज्ञात
शब्दादी विषयांचे हवन इंद्रियरूपी यज्ञात ॥२६॥
*
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ ४-२७ ॥
*
कोणी होउन ज्ञानप्रकाशे इंद्रिय-प्राण कर्मांच्या
हवन करिती अग्नीत आत्मसंयमरूपी योगाच्या ॥२७॥
*
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ ४-२८ ॥
*
मनी धरून द्रव्य लालसा कोणी करिती यज्ञ
काही सात्विक भाव समर्पित करीत तपोयज्ञ
अन्य योगी योगाचरती करिती योगरूपी यज्ञ
व्रत आचरुनी स्वाध्याने काही करिती ज्ञानयज्ञ ॥२८॥
*
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ ४-२९ ॥
*
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति ।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ४-३० ॥
*
कोणी योगी प्राणवायुचे हवन करिती अपानवायूत
अन्य तथापि अपानवायू हवन करिती प्राणवायूत
आहार नियमित ते करिती निरोध प्राणापानाचे
त्यांच्या करवी हवन होते प्राणामध्ये प्राणाचे
समस्त योगी असती साधक अधिकारी ते यज्ञाचे
पुण्याचे अधिकारी सारे उच्चाटन करिती पापांचे ॥२९-३०॥
☆
– क्रमशः भाग ४
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈