सुश्री मीनाक्षी सरदेसाई
(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६, नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)
आज प्रस्तुत है आपकी एक कविता —–कामवाली —– . हम भविष्य में भी आपकी सुन्दर रचनाओं की अपेक्षा करते हैं।
☆ —–कामवाली —– ☆
कामवाली आहे मी, कडाडती वीज आहे !
घर मालकिणीनो,एक गार्हानं गानार आहे !!
आमच्यामुळे नोकरी तुमची,
तीस,चाळीस हजारांची
त्यातले तीन चार मला दिलेत
तरच मी टिकनार आहे. एक गार्हान —
सिक सांगून ‘लीव्ह ‘काढता
घरातूनच ‘शी एल ‘कळवता
मी जवा खरीच फनफनते
पगारी खाडा करनारच आहे. एक गार्हान —-
ग्यास, दूध,पेट्रोल वाढल
तुम्हाला गाडी परवडेना ?
आमाला सादी कापडं चोपडं
चटनी भाकरी बी मिळना.
म्हागाईचा कहर आहे एक गार्हान—
तुमचा फंड बिंड, पेन्शन,
आमाला हलकं राशन
ते आनायला बी पैसा नाही.
बचत? छे! उरतच नाही.
उधार, उचल मागनारच आहे. एक गार्हान–
ज्याला, त्याला मानसं लाऊन
तुमचा संसार नीटनेटका
पोराना म्हागड शिक्षन
फारेनचा खोर्याने पैका.
माजबी पोरग साळत जातय
त्याला मी इंजिनिअर करनार आहे
फाटक्याला ठिगळ लावनार आहे।
म्हनूनच ह्ये गार्हान गाते आहे.।।।
© मीनाक्षी सरदेसाई
मोबाईल नंबर 9561582372, 8806955070