कविराज विजय यशवंत सातपुते
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है आपकी कामगारों के जीवन पर आधारित एक भावप्रवण कविता “कामगार” )
☆ कामगार ☆
जगानं कितीही प्रगती केली
तरी वर्षानुवर्ष झोपडीत
मुक्कामाला राहिलेलं दारीद्रय
हलता हललं नाही झोपडीतून. . . . !
या दारीद्रयानच सा-यांना
कामाला लावलं, कामगार बनवलं
कामगार, कामगार
निळी काॅलर निमुटपणे
घामच गाळत राहिली.
कधी रोजंदारीवर तर कधी
महिन्याच्या बोलीवर
कामगार आजा, बाप
मरमर राबताहेत.
झोपड्या बदलल्या
पण झोपडपट्टी काही सुटली नाही.
दारीद्र्याला कंटाळून
आम्ही पण पाहिली स्वप्न .. .
चांगल शिक्षण घेऊन
सरकारी नोकरदार व्हायची.
पण कसचं काय
मिसरूड फुटली नी . . शाळा सुटली.
पाटी फुटली आन
जेवणाच्या डब्यात जिंदगी आटली.. !
कर्ज ,पाणी, दवा, दारू
सारी हयात अशीच कटली.
बॅक नावाची ईमारत लांबूनच दिसली.
पैशाची काढघाल करायला पैशाची चळत
उभ्या जिंदगीत शिलकीतच नाय पडली.
जितकं कमावलं तितकं गमावलं.
कामगाराचं जिणं ,कामातच राहिल.
सरकार आलं, सरकार गेलं.
घामाचा दाम द्येवून ग्येलं.
हातावरचं पोट आमचं
दोन येळच्या अन्नासाठी
कामाच्या शोधात सारी दुनिया
वणवण करीत राह्यलं.
सारा महाराष्ट्र फिरलो राब राब राबलो..
कामगार होतो. . . कामगारच राहिलो. . . !
भारत माझा महान शुभेच्छा देत घेत
झोपडीत होतो झोपडीतच राहिलो. . . !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.