मानवीय एवं राष्ट्रीय हित में रचित रचना
श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी की कोरोना विषाणु पर एक समसामयिक रचना “कोरोनाचा पोवाडा ”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है। ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )
☆ केल्याने होतं आहे रे ☆
☆ कोरोनाचा पोवाडा ☆
अहो पहा भय़ंकर हा कोरोना !
याने जगाची केली कशी दैना !
म्हणे चीनने पाठवला नमुना !!१!!
कोरोनाचा विषाणु जबरदस्त!
वरुन काटेदार आतून चुस्त !
जाऊन बसतो आधी घशात !
तिथून घुसतो मग फुफ्फुसात !
नंतर घालतो धिंगाणा शरीरात !!२!
सोडले नाही पंतप्रधान ब्रिटन!
सौदीच्या दीडशे राजपुत्रांना लागण !
गावेच्या गावे झाली बंदीवान !
असा हा कोरोना आहे भयाण!
रहा घरात शासनाचं आवाहन!
आम्ही सर्व घरातच राहून !
करु यशस्वी लोकडाऊन !!३!!
आम्ही आहोत सारे बलवान !
कोरोनाशी दोन हात करुन !
देऊ त्याला लौकर घालवून !
देऊ त्याला लौकर घालवून …
नक्की घालवून..
होऽऽऽ जी..जी…जी…जी.जी.ऽऽऽ..
©️®️ उर्मिला इंगळे, सातारा
दिनांक:-१४-४-२०
!! श्रीकृष्णार्पणमस्तु !!