श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆
?? दिवाळी फराळ ??
दिवाळी आली दिवाळी!
म्हणून घेतली चकली करायला!
तर जिलबी म्हणते चकलीला!
तू तर बाई तिखट तेलकट!
मी बघ कशी गोड गोजिरी सर्वांना प्यारी प्यारी !
माझ्याशिवाय नाही होत साजरी साताऱ्याची २६ जानेवारी!!
चकली म्हणते काय गं गाजवतेस तुझ्या गोडपणाचा तोरा ?
म्हणतात तुला खाल्ली की वाढते शुगर अन् बिघडते फिगर !
आणि काय गं तूंच तेवढी गोल गोजिरी ?
गोड गोड लाडूविना होते कां दिवाळी साजरी?
लाडू म्हणे मोतीचूर ..
मी तर सुबक सुंदर सोनेरी!
माझ्या चवीची तर लज्जतच लईऽऽई भारी !
पण जोडीला हवी हो चिवड्याची खमंग खुमारी !!
खाऱ्या गोड्या शंकरपाळ्यांची चहाशी मजा लऽऽई..न्यारी!!
पुडाच्या करंजीला फराळाच्या ताटात प्रथम मान!
कडबोळे आकाराने असतात वेगळे पण मिरवून जातात शान !!
शेवपापडी चिरोट्यांनी गर्दी केली थोबा !
पण रवा-बेसन लाडूशिवाय फराळाला नाही हो शोभा ?
असा दिवाळीचा फराळ घरच्या सर्वांनी एकत्र बसून खावा !
अशी प्रत्येक गृहिणीची असते अगदी मनापासून इच्छा!
अन् सर्वांना दिवाळीच्या मनापासून गोड गोड शुभेच्छा!!!
दिनांक:-१२-११-२०.
©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
सातारा