श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी की रचना “फुगडी कोरोनाची ”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है। ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )
☆ केल्याने होतं आहे रे # 35 ☆
(काव्यप्रकार :-मुक्तछंद)
फू बाई फू.. फुगडी फू..वाढ वाढ वाढतोयस कोरोना तूं रे कोरोना तूं.ऽऽ.!!धृ.!!
विमानातनं आलास !
हाहा म्हणता पसरलास!
तग धरुन बसलास !!१!! आता फुगडी फू….
कोरोना रे कोरोना !
तुझा लाडका चायना !
व्हायरस पाठवून केली की हो दैना !
कोरोनाची पीडा आता जाता जाईना !!२!! फुगडी फू…
अमेरिका फ्रान्स स्पेन अन् इटली !
चायनाची तर हौसच फिटली !
लाखोंची पतंग याने की हो काटली !!३!! आता फुगडी फू…
कोरोनाचा तर वाढतोय जोश!
त्यावर नाही अजून निघाला डोस !
गावेच्या गावे याने पाडली ओस !
जिकड तिकडं याचाच घोष !!४!! आता फुगडी फू..
आम्ही नाही हरणार !
शासनाचे ऐकणार!
घरातच रहाणार!
फळे आम्ही खाणार!
सात्त्विक आहार घेणार !
तुला पळवून लावणार !
जोमाने उभे रहाणार!!५!! आता फुगडी फू…
©️®️उर्मिला इंगळे
सातारा
दिनांक:२१-५-२०.
!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!