मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य – श्रावण येतो  आहे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है  श्रवण माह पर विशेष कविता  “श्रावण येतो  आहे )

☆ विजय साहित्य – श्रावण येतो  आहे ☆

 

पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे.

फुलवित हिरवी स्वप्ने आपली,श्रावण येतो आहे. ||धृ.||

 

घनगर्भित नभ गर्द सावळे, इंद्रधनुची अवखळ बाळे

तनामनावर लाडे लाडे, कोण उचलूनी घेतो आहे?

पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे.

फुलवित हिरवी स्वप्ने आपली,श्रावण येतो आहे. ||1||

 

भिजली झाडे,भिजली माती,सुगंध मिश्रीतअत्तरदाणी

अन् चंदेरी गुलाबपाणी,  कोण धरेवर शिंपीत आहे?

पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे.

फुलवित हिरवी स्वप्ने  आपली, श्रावण येतो  आहे. ||2||

 

श्रावण मासी,हर्ष मानसी,मनात हिरव्या ऊन सावली.

रविकिरणांची लपाछपी ती,कोण चोरूनी बघतो आहे ?

पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे.

फुलवित हिरवी स्वप्ने आपली, श्रावण येतो  आहे. ||3||

 

किलबिल डोळे तरूवेलींवर,चिमणपाखरे गिरिशिखरांवर

ओल्या चोची,ओला चारा, कोण कुणाला भरवत आहे?

पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे.

फुलवित हिरवी स्वप्ने  आपली, श्रावण येतो  आहे. ||4||

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798