सुश्री मीनाक्षी सरदेसाई
(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। आप मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६, नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)
आज प्रस्तुत है आपकी एक पक्षी एवं झाड़ के मध्य संवेदनशील संवाद पर आधारित भावप्रवण कविता संवाद । हम भविष्य में भी आपकी सुन्दर रचनाओं की अपेक्षा करते हैं।
☆संवाद☆
पक्षी असतो झाडाचा आवडता दोस्त।
मनातलं गुपित ते त्यालाच सांगतं ।
पक्षी– चिवचिव, टिवटिव, झाडा कसं काय?
झाड- तूच सांग. माझे तर रोवलेले पाय.
पंख हलवित गेलास एकट्याला सोडून.
मित्रा, आत्ता तू आलास तरी कुठून?
काय काय पाहिलंस–कसे होते देश?
कशी तिथली झाड?कसे त्यांचे वेश?
पक्षी- थांग, निळ्या, आभाळात मी उडतो.
तिथे देशाबिशांचा नकाशाच नसतो.
कुठे हिरवी झाड, रंगीत फुलं
घोसदार, रसदार गोड गोड फळं.
कुठे गार वारा, कुठे छान हवा.
इथे नि तिथे , फिरलो गावागावा.
कुठे मात्र वाळवंट, कुठे माळ उजाड.
कुठे गार बर्फ, मग कसं उगवेल झाड?
तिथे मला तुझी आली फार आठवण.
पालवित पंख आलो बघ चटकन .
थरारलं झाड , पक्षाचं ऐकून.
जसं काही तेच आलं होतं फिरून.
झाडाच्या पानात पक्षी झोपला गाढ.
दवाच्या थेंबात भिजत होतं झाड।।
© मीनाक्षी सरदेसाई
‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.
मोबाईल नंबर 9561582372