कविराज विजय यशवंत सातपुते
☆ साप्ताहिक स्तम्भ # 88 – विजय साहित्य समर्पण ! कविराज विजय यशवंत सातपुते ☆
तेजोवलये क्षीण जाहली
निरोप घेता घेता.
त्वरे परतुनी येईन पुन्हा
गाज सागरी सांगे जाता.
अनुभवाचा परीघ हवासा
रवी जातसे अस्ताला
वा-यावरती सांज सावल्या
आठवणींच्या मस्तीला.. . . !
बघ सोनेरी झाले पाणी
वेचून घे ते शाब्दिक मोती .
आठवणींना आले बाळसे
कण वाळूचे सरकत जाती.. !
असा दुरावा आणि मिलन
रवी बिंबाचे अस्त विलेपन
अन लाटेची अवखळ मात्रा
हसते जीवन करी समर्पण. . . . !
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈