सुश्री मीनाक्षी सरदेसाई
(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। आप मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६, नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)
आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता हिरवं घर। हम भविष्य में भी आपकी सुन्दर रचनाओं की अपेक्षा करते हैं।
☆ हिरवं घर ☆
झाडांची मुळं जमिनीखाली
खेळत असतात
पळापळी.
दमतात तेव्हा
नदीवर जाऊन
पळत येतात
पाणी पिऊन.
झाडांची पानं
आईचे हात
शिजवून घालतात
वरणभात.
बाबा कोण?
सूर्याचं ऊन्ह.
पगार पाठवतात
दूर राहून.
झाडांची खोडं
आजी आजोबा.
मुळं त्यांना आणून
देतात चहा.
झाड म्हणजे एक
घरच असतं.
सावलीत त्याच्या
किती छान वाटतं
© मीनाक्षी सरदेसाई
‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.