श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆
?? हुर्डा पार्टी ??
लोकमान्य हास्य योग संघाच्या !
साऱ्या सख्या निघालो पार्टीला!
अहो ! कसल्या पार्टीला ?
हुर्डा पार्टीला ऽ.ऽ..!!
अहो बसा बसा लौकर गाडीत !
जाऊ मस्त गप्पा त्या ठोकीत !
चिमणचारा चाखीत !
हास्य विनोदाला येई ऊत!!
सोडून घरादाराची काळजी !
आज आम्ही आमच्या मनमौजी!
गाण्यांच्या रंगल्या की हो भेंड्या !
एकमेकींवर करतोय कुरघोड्या !!
गुळभेंडी ज्वारीच्या शेतातली !
खुडून कणसं आम्हीआणली !!
शेणकुटांची आगटी पेटवुनी !
घेतली कणसं आम्ही भाजूनी !!!
खाया बसलो मांडा ठोकुनी !
हुर्ड्याला दही लसनीची चटनी !
ताव मारतोय मस्त साऱ्याजनी !!
भन्नाटच हुर्डा पार्टी रंगली !
गाडीवाल्याची हाक कानी आली !
चला चला निघायची वेळ झाली !
अहो..चला चला निघायची वेळ झाली!!
लागलो एकमेकींना उठवायला !
हुर्डा खाऊन जडपणा आला !!
पण. ! मस्त झाली आपली हुर्डा पार्टी !
सख्यांनो..सांगा बरं.ऽऽऽ..
पुढली कुठं रंगणार आपली पार्टी !!
अहो पुढली कुठं रंगणार आपली पार्टी……हा..हा..हा..हा..
©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
सातारा
दिनांक:-९-१-२०२१