श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काही कविता… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

गरगरणारा पतंग

विसावला झाडाच्या फांदीत..

दुखावलेल बाळ जणू आईच्या कुशीत…

           ***

 

उगमापाशी पाणी

हसत पळतय खळखळून…

त्याला काय माहित पुढे काय ठेवलंय वाढून..

          ***

 

उजाड माळरानावर

पाहिलं एका गवतफुलाला….

तेवढाच विसावा रखरखत्या डोळ्याला..

         ***

 

डेरेदार वृक्ष

दिवसा किती वाटतो सुंदर…

तोच तीन्हीसांजेनंतर वाटतो भयंकर…

         ***

 

घर उघडत नाही खिडकी

सहन करुनही वाऱ्या.. पावसाचे वार…

जणू माझ्या बंद मनाचे दार…

          ***

 

दमलेलं पाखरू

क्षणभर फांदीवर विसावलं….

उडून जाताना त्यानं वळुन नाही पाहिलं ….

          ***

 

तळ्यातलं आकाश अन् डोक्यावरचं

यातला फरक पक्ष्याला कळतो….

तो हवेतच झेपावतो….

          ***

 

वेलीला मांडव काय

अन् झाड काय…

काटेरी कुंपणावरही कसा तरारून चढलाय…

         ***

 

बाळाला झोपवून

ओसरीवर आले…

तर ‘मनी’चे पिल्लू पायाशी घोटाळले…

          ***

 

कुहुकते कोकीळा

म्हणून खिडकी उघडली…

गच्च मोहरलेली बाग दिसली…..

      ***

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments