श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 113 – हे बंध रेशमाचे ☆
ताई माझी हिरकणी
झेप तिची वाघीणीची।
बाणा कणखर तरी
मनी प्रित राजसाची।
अशी लाघवी निर्मळ
जोडी लाभली प्रेमळ।
लाभे मृगनयनीला
दोन पाडसं सोज्वळ।
करी पक्वान्न सुरस
प्रेमे भरवी आवडी।
सखे हातात ग तुझ्या
असे अमृताची गोडी
भाऊबंध नातीगोती
संगे साथी नि सोबती
बंध रेशमाचे जोडी
दोन ह्रदये जाणती ।
नसो उणे इथे काही
जोडी राहो जन्मांतरी।
मार्ग उजळो यशाचा
साथ लाभो सौख्यांतरी।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈