श्री अमोल अनंत केळकर
☆ कवितेचा उत्सव ☆ खोटी खोटी रुपे तुझी ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
(मागे एकदा देशातील काही भोंदू रत्नांची नवे जाहीर झाली आणि मग आम्हालाही त्यांची अशी आरती करण्याचा मोह आवरला नाही.)
खोटी खोटी रुपे तुझी खोटे डेरे मठ सारे
कुठे कुठे ठोकू तुला, तुझे अघोरी कृत्य सारे ।।धृ।।
नीच गोष्टी ज्या ज्या काही, तिथे तुझा वास
तुझा आशीर्वाद देतो, गुंडांना निवास
चरा चरा गंडविशी संग तुझा कशाला रे ।।
खरे रूप भोंदू बाबा कोणते कळेना
नको जामिनावरी तूच , तुरुंगी रहा ना
तुला अडकवाया घ्यावा, पिनल कोड कोणता रे ।।
© श्री अमोल अनंत केळकर
नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
मैफिल ग्रुप सदस्य
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈