श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 117 – बाळ गीत – सुंदर माझी शाळा

सुंदर माझी शाळा, लाविते लळा ।

वाजवूनी घंटा ही खुणावते बाळा ।।धृ।।

 

मोठ्या या मैदानी जमले ताई भाऊ।

खूप खूप नाचू आणि गाणी गाऊ ।

नियमित या सारे नको कानाडोळा ।।१।।

 

मधोमध फुले कशी छान फुलबाग।

फुलपाखरां मागे मुलांची ही रांग ।

फुला भोवती होती मुले सारी गोळा ।।२।।

 

ताईनेही आता सोडून दिली छडी।

म्हणतच नाही घाला हाताची घडी।

खूप खूप खेळणी वाटेल ते खेळा ।।३।।

 

जवळ घेत मला बोले लाडेलाडे ।

म्हणत नाहीत नुसते पाठ करा पाढे।

बिया मणी खडे केले आम्ही गोळा ।।४।।

 

अकं अक्षर गाडी जोरदार पळते ।

चित्राची गोष्ट कशी झटपट कळते।

शब्द डोंगराकडे आता थोडे वळा ।।५।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments