मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सोनेरी सांज… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ सोनेरी सांज… ☆ श्रीशैल चौगुले ☆

मन सोनेरी ऊन्हात

सांजवेळी राना-वनात

श्रीफळ जटा सुंदर

जणू शिंपणाची वरात.

 

संथ वार्याची झुळूक

नाचे वेल-वृक्षाचे पान

निरभ्र नभात सांज

पक्षी पिलांचे माया गान.

 

हिरवी जर्द धराई

श्रावण सुख अप्रुबाई

झरे तीर सरोवर

डोंगर वाटातली घाई.

 

रातराणी नि जाईजुई

चांदण चाफा शुभ्रभाव

मंदिरी अंगणी फुलवा

सांजललना नत् जीव.

 

भाळी लालबुंद कुसूम

छटा सृष्टीवरती कृपा

आता अटळ हा निरोप

पांघर दाट शाल दिपा.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈