प्रा.सौ. सुमती पवार
☆ कवितेचा उत्सव ☆ काळजाच्या पायथ्याला…..☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
काळजाच्या पायथ्याला, वेदनेचा गाव आहे
सांगती ना पहा कुणी ही माणूस हा साव आहे…
कुढती किती ते अंतरी पण,पण मुखावरी ते हास्य आहे…
लाचार चेहरा माणसाचा हाय ! नशिबी दास्य आहे…
काळजाची वेदना ती हात हृदयालाच घाले
कळ येते जीवघेणी मन माणसाचे सोले
झाला जरी घायाळ कोणी हसून करतो साजरे
दहशत आहे भोवताली,घोट घेती मांजरे..
त्या परी हृदयात आहे कोंडलेले ते बरे
उसवताच त्याच जखमा फाडून खाती मांजरे
शिवून घेती आत आत दाखविती ते दात हो
भळभळणाऱ्या साऱ्या जखमा ..
मखमली तयांचा पोत हो …
गाठोडे ते घेऊन जाती सरणावरी ते थेट हो
दु:ख्ख आणि वेदनेची माणसाशी मोट हो
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि: १३/१०/२०२० वेळ: रात्री: ११:३०
(९७६३६०५६४२)
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈