सुश्री संगीता कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ !! सूर्य !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
आला दिनकर पूर्वेस
सुवर्ण रश्मी घेऊन हजार
आला आसमंत उजळत
रंग आकाशी पसरे चौफेर
आरक्त लाली क्षितीजावर
जाहली सुरू पक्षांची किलबिल
करती कलरव कलकल
दशदिशा करती पुकार
सूर्याच्या किरणांनी
जाग पापण्यांना आणली
किमया त्या किरणांची
ओल्या दवांनी जाणली
ललना घेऊनी घट कमरेवरी
शिंपती जल अंगणी
रेखूनी सडा- रांगोळी
सजविती अंगणी…!!
© सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈