सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ राधा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

एकटी तुझ्याविण, राहू कृष्णा, कशी मी वृंदावनी !

राधा करिते, मनी खंत ती, विरहाच्या त्या क्षणी!

 

गोकुळ सोडून, कान्हा जाई ,

दूर राहिली राधा!

जाळीत राही, राधेला त्या,

कृष्ण विरहाची बाधा !

 

कृष्ण बासरी, ऐकू येई

राधेला अंतरी !

बासरीत त्या, सूक्ष्म होऊनी,

राधा गाई उरी !

 

मोरपीस राधेने दिधले,

 कृष्ण वागवे शिरी !

तुझीच साथ, सोबत कायम, ठेवील हो श्रीहरी!

 

अखंड दिसतो, कृष्ण तिला,

मन वृंदावन होते !

राधाकृष्ण एकरूप होता

मन तृप्त तिचे होते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments