श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ क्रांतीसूर्य सावरकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
जयोस्तुते श्री परम् विक्रमी क्रांतीच्या सूर्या
तेजोमय ही जीवनारती आपण गाऊया ।
☆
राष्ट्राचा अभिमान सार्थ तू स्फूर्ती शहिदांची
पूजा बांधिली प्राणपणाने स्वातंत्र्यदेवीची ।
☆
खड्गासंगे कलमाच्या तू इतिहास रचियेला
पतिता संगे पतित पावन पावन तू केला ।
☆
पर्वत बनुनी धैर्याचा तू झुंज कधी देशी
सार्थ नाम हे ‘विनायक’, तू शब्दप्रभू होशी ।
☆
शक्ती, बुद्धी ही तुझीच रूपे तू शूर सेनानी
अनादी आणि अनंत तू ,गातो तूज कवनी ।
☆
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈