श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 178
☆ भावनांचा रंग… ☆
भावनांचा रंग आहे वेगळा
ओठ माझा त्यास वाटे जांभळा
डाग नाही एकही अंगावरी
टाकुनी तो रंग झाला मोकळा
काय सांगू मी घरी सांगा मला
खंत नाही त्यास तो तर बावळा
पेटते होळी तशी देहातही
साजरा दोघे करूया सोहळा
धूळ माती फासली अंगास तू
रंग गोरा जाहला बघ सावळा
आग आकाशात होती पोचली
पाहिलेला सोहळा मी आगळा
शांत झाली आग आहे कालची
लाकडांचा फक्त दिसतो सापळा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈