सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ रुणझुण पैंजणाची… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
क्षितीजावर सांजरंग
आज का उदासले
विराणीचे सूर असे
ओठावरी उमटले
याद तुझी दाटूनिया
मनासी या छळतसे
चांदणेही पसरलेले
आज मज जाळतसे
वेड्या मना पानोपानी
होती तुझेच भास
जीव व्याकूळ असा
मनाला तुझीच आस
रुणझुण पैंजणाची
मना घाली उखाणे
नको रे तुझे सख्या
सारेच ते बहाणे
वाटेचे तुझ्या सखया
करिते फिरूनी औक्षण
तुझ्याविना युग भासे
मजसी रे क्षण क्षण
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈