महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 126
☆ वृक्षवल्ली आम्हां सोयरे… ☆
वृक्षवल्ली आम्हां सोयरे
नारे फक्त लावल्या गेले
वन मात्र उद्वस्त झाले..०१
वृक्षवल्ली आम्हां सोयरे…
अभंग सुरेख रचला
आशय भंग झाला..०२
वृक्षवल्ली आम्हां सोयरे
झाडांबद्दलची माया
शब्द गेले वाया..०३
वृक्षवल्ली आम्हां सोयरे
वड चिंच आंबा जांभूळ
झाडे तुटली, तुटले पिंपळ..०४
वृक्षवल्ली आम्हां सोयरे
संत तुकारामांची रचना
सहज पहा व्यक्त भावना..०५
वृक्षवल्ली आम्हां सोयरे
तरी झाडांची तोड झाली
अति प्रगती, होत गेली..०६
वृक्षवल्ली आम्हां सोयरे
निसर्ग वक्रदृष्टी पडली
पाणवठे लीलया सुकली..०७
वृक्षवल्ली आम्हां सोयरे
पाट्या रंगवल्या गेल्या
कार्यक्रमात वापरल्या..०८
वृक्षवल्ली आम्हां सोयरे
वृक्षारोपण झाले
रोपटे तडफडून सुकले.. ०९
वृक्षवल्ली आम्हां सोयरे
सांगणे इतुकेच आता
कोपली धरणीमाता..१०
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈