श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 158 ☆ संत सेना महाराज…☆ श्री सुजित कदम ☆

उच्च विचारसरणी

संत सेना महाराज

वैशाखात द्वितीयेला

जन्मा आले संतराज…! १

 

न्हावी समाजाचे संत

भक्ती रस अभंगात

व्यवसाय करताना

दंग सदा पुजनात…! २

 

बुद्धी चौकस चंचल

समतेचा पुरस्कार

हिंदी मराठी भाषेत

केल्या रचना साकार….! ३

 

महाराष्ट्र पंजाबात

दोहे अभंग रचले

विठ्ठलाच्या चिंतनात

सारे आयुष्य वेचले…! ४

 

हजामत करताना

मुखी विठ्ठलाचे नाम

वारकरी चळवळ

भक्तीभाव निजधाम…! ५

 

हिंदी मराठी काव्याचा

केला मुक्त अंगीकार

संकीर्तन प्रवचनी

केला अध्यात्म प्रसार…! ६

 

नाम पर उपदेश

पाखंड्यांचे निर्दालन

गुरू ग्रंथ साहेबात

दोहा अभंग लेखन…! ७

 

सुख वाटतसे जीवा

जाता पंढरीसी कोणी

साध्या सोप्या रचनेत

शब्द धन वाही गोणी…! ८

 

दाढी करताना दिसेल

राजालाही भगवंत

संत सेना महाराज

प्रादेशिक कलावंत…! ९

 

दीर्घ काळ पंढरीत

सेना न्हावी करी सेवा

हरिभक्ती पारायण

दिला अभंगांचा ठेवा…! १०

 

श्रावणाची द्वादशी ही

पुण्यतिथी महोत्सव

संत सेना महाराज

करी  अभंग उत्सव…! ११

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments