श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
मिरचीचा ठसका !
श्री प्रमोद वामन वर्तक
लागता हिचा ठसका
डोळ्या लागती धारा,
पाणी प्यायल्या विना
वाटे ना जिवा थारा !
छटा हिरव्या रंगांच्या
हिच्या मधे दिसतात,
लवंगी कोल्हापूरची
तिखटजाळ म्हणतात !
आकाराने जरा जाडी
येई वेगळ्या कामाला,
मसाला भरून त्यात
भजी घ्या तळायला !
लाल रंगाची हिची बहीण
नांव तिचे शंकासूरी,
टाका गरम मसाल्यात
चव आणेल त्या भारी !
पण
जा हिच्या वाटेला बेतानं
“मागे” लागेल व्याधी नसती,
वांधे होतील बसायचे
मनी धरा त्याची भीती !
मनी धरा त्याची भीती !
© प्रमोद वामन वर्तक
११-०२-२०२३
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈